file photo 
मराठवाडा

परभणी : लोअर दुधनाच्या पाणी पाळीची शेतकऱ्यांना लागली आस, पाणी पाळीचे नियोजन झाले नसल्याने संभ्रावस्था

अनिल जोशी

झरी (जिल्हा परभणी) ः लोअर दुधना प्रकल्प या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतू अद्यापही लोअर दुधनाच्या पाण्याचे नियोजन केले नसल्यामुळे रब्बीमध्ये गव्हाचे पीक घ्यायची की नाही अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे.

यावर्षी प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. अशातच शासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी पाळी जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य अवस्था तयार झाली आहे. हे पाणी पाळी जाहीर झाली असती तर शेतकऱ्याला आपल्या पिकाचे नियोजन कसे करायचे हे करण्यासाठी खूप फायदेशीर ठरत होते. परंतु दोन जिल्ह्याच्या कारभारामुळे अद्याप पर्यंत ही पाणी जाहीर झालेला नाही. जर ही पाणी पाणी लवकर जाहीर झाली असती तर, शेतकऱ्याला गव्हाचे आणि हरभऱ्याचे पीक जास्त उत्पादन घेता आले असते. सद्यस्थितीला कपाशीचे पीक हातचे गेल्यामुळे कपाशी उपटून त्याठिकाणी हरभरा किंवा गहू शेतकऱ्याला घेता आले असते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यास नुकसानकारक होत आहे. त्यामुळे लवकरच पाणी पाळी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

प्रतिक्रिया

पाणी पाळी नियोजनाचा पूर्ण अधिकार जालनातील अधिकाऱ्याला आहे. लोअर दुधनाच्या ओलीताचा भाग परभणी जिल्ह्यात असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या समन्वयाअभावी पाणी पाळी अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

- संतोष देशमुख, शेतकरी

लो दुधना च्या डाव्या कालव्याच्या बाजूला माझी पंचवीस एकर शेती आहे त्या शेतीमध्ये कपाशी आहे जर पाणी पाणी नियोजन जाहीर झाले असते तर ती कपाशी उपटून मला रब्बीतील हरभरा किंवा गहू पीक घेता आले असते अद्याप पर्यंत पाणी पाळी जाहीर न झाल्यामुळे मी संभ्रमावस्थेत आहे

- मोसिन काजी, शेतकरी

पाणी पाणी जाहीर न झाल्यामुळे मला गव्हाचा पेरा जास्त ठेवायचा होता परंतु अद्यापही पाणी पाणी जाहीर न झाल्यामुळे सदरील शेतात मला ज्वारीचे पीक घ्यावे लागले त्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे

- ब्रह्मानंद सावंत, शेतकरी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT