aanchal goyal aanchal goyal
मराठवाडा

Parbhani : मुलांसाठी वसतिगृह सुरू होणार;आंचल गोयल

महाराजस्व अभियानांतर्गत साहित्याचे वाटप

राजेश नागरे

गंगाखेड : ‘‘ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतीगृह सुरू केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पालकांनी या वसतिगृहास प्रतिसाद द्यावा’’, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याअंतर्गत महाराजस्व अभियान तालुक्यात राबविण्यात आले. यानिमित्त प्रशासनाच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त रविवारी (ता. दोन) लाभार्थींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रासह साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार गोविंद येरमे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, स्वाती वाकोडे, महावितरणचे नितेश भासारकर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, तालुका आरोग्य अधिकारी उमाकांत बिराजदार, युवा उद्योजक राजाभाऊ फड, रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे आदींची प्रमुख उपस्थित होती. जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या, ‘‘प्रशासन आपल्या दारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतीगृह सुरू करणार असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पालकांनी या वसतिगृहास प्रतिसाद द्यावा. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी तुती लागवड, फळबाग लागवड यासह इतर पिके घ्यावीत,’’ असे आवाहन त्यांनी केले.

उपस्थितांना आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी भ्रमणध्वनीद्वारे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण व पूजा दर्डा यांनी केले. आभार तहसीलदार गोविंद येरमे यांनी मानले.

प्रलंबित कामे मार्गी

ता. १७ सप्टेंबर ते ता. २ ऑक्टोबर दरम्यान महाराजस्व अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक कार्यालयातील प्रलंबित कामांच्या याद्या तयार करण्यात आल्या. यानुसार नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावली. यामध्ये उज्ज्वला गॅस योजना, घरकुल आवास योजना, मीटर वाटप, मतदार कार्ड वाटप, आधार कार्ड वाटप, पॅन कार्ड वाटप, प्रमाणपत्र वाटप, दाखले वाटप, पोट खराब जमिनीची लागवडीखाली नोंद घेण्यात आली. शंभर लाभार्थींच्या घरकुलाचा पहिला हप्ता डिजिटल पेमेंट अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीड कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात आले; तसेच ६०६ फळबाग लागवड मंजुरी आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. पाच महिला बचत प्रत्येकी गटास दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT