parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani News : ग्रामस्थांनी उधळला वाळूचोरीचा डाव

वाळूमाफियांना झटका पाटोदा गावात स्फोटकांनी उद्ध्वस्त केली बोट

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पाथरी- पाण्याखाली असलेल्या वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी बोट व मोटार या यंत्राच्या सहाय्याने वाळू चोरीचा आखलेला डाव जागरूक पाटोदा ग्रामस्थांनी उधळून लावला आहे. ही घटना मंगळवारी (ता.३) सकाळी घडली. यावेळी ग्रामस्थांनी काही परप्रांतीय मजुरांना पकडून तहसीलदारांना माहिती दिल्यानंतर महसूल व पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तर, दुपारी स्फोटकांनी बोट उद्ध्वस्त केली.

अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या माध्यमातून मोठा पैसा मिळत असल्याने पाथरी तालुक्यातील गोदावरी नदी किनारी भागातून वाळूची सर्रास चोरटी वाहतूक व विक्री होत आहे. अवैध वाळू वाहतुकीसाठी हायवाऐवजी कमी वेळात गल्ली बोळात जाणारा पिकअप व छोटा हत्ती ही वाहने वापरली जात आहेत. ज्याठिकाणी गोदावरी नदी पात्र कोरडे आहे,

त्याठीकाणी माणसाच्या व जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करून विक्री होत आहे. तालुक्यातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या उच्चपातळी बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमधून यारी मशिन, बोटच्या सहाय्याने वाळू उपसा करताना डाकू पिंप्री शिवारात कारवाई झाल्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. आता वाळू माफियांनी त्यांचा मोर्चा ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटर खाली असलेल्या वाळूकडे वळविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पाटोदा गावाशेजारील गोदावरी नदीपात्रात बोट, मोटार व लोखंडी पाइप अशी आधुनिक वाळू उपसा करणारी यंत्रणा काही लोक नदीपात्रात चालवत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता या ठिकाणाहून पळून जाण्याच्या तयारीत असलेली काही परप्रांतीय मजूर त्यांना सापडले.

या सर्वांना गावात आणून याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांना देण्यात आली. पोलिस व महसूलचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. महसूल विभागाकडून घटनास्थळी पंचनामा करण्याची कारवाई करण्यात येत होती. दरम्यान, जप्त करण्यात आलेली सर्व यंत्रसामग्री स्फोटकाच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आली असून घटनेची पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT