file photo 
मराठवाडा

परभणी : पुरातन बारव उपसली श्रमदानातून; रायपूर- ऐतिहासिक बारवाचे पुन्हा जतन

संजय मुंडे

वालूर ( ता. सेलू, जिल्हा परभणी ) : सेलू तालुक्यातील रायपूर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन श्रमदानातून जुनी पुरातन बारव उपसली. बारवाच्या जुन्या शिळांना व्यवस्थित लावत पुरातन ऐतिहासिक ठेव्यास पुनर्जीवन दिले. विशेष म्हणजे हे काम कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात ग्रामस्थांनी केले. 

सेलू तालुक्यातील रायपूर येथे लॉकडाऊन दरम्यान सर्व गावातच आप आपल्या घरी होते. कोणीही बाहेर निघाले नाही. गावातील सप्ताह ही यावर्षी झाला नाही. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी विशेतः युवकांनी गावात असलेला पुरातन बारव उपसण्याचे ठरवले. जुने लोक हा बारव खोल असल्याचे सांगत असल्याने याची नेमकी खोली किती, यात पाणी लागेल का, येथील जु्न्या शिळांचे काय झाले असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी युवकांनी एकत्रित येत ग्रामस्थांच्या सहकार्याने बारव उपसण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्वांनीच श्रमदानासाठी पुढाकार घेण्याचे ठरले. सर्वांनी एकत्रित येत कामास सुरवात गेली. जवळपास ४० ते ५० फुट खोल असलेली बारव उपसण्यात आली. यासाठी विहिर खोदण्यास लागणार्‍या क्रेनचेही सहाय्य घेण्यात आले. श्रमदानासाठी कोणीही माघार न घेता सर्व ग्रामस्थ एकत्रित प्रयत्न केल्याने बारव पूर्णतः उपसण्यात यश आले.

बारव उपसताना तेथे लावलेल्या शिळाही व्यवस्थित लावत हळूहळू बारव उपसण्याचे काम सुरु होते. फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून गावातील तरुणांनी हे कार्य स्वयंप्रेरणेतून केले. ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आज घडीला बारवेत निथळ पाणी पहायला मिळू लागले आहे.
गावातील दादासाहेब गाडेकर, अंकूश गाडेकर, पांडुरंग सोळंके, लक्ष्मण गाडेकर, राजाभाऊ गाडेकर, हरिभाऊ, प्रल्हाद गाडेकर, जिजाभाऊ हिंगे, तातेराव गायकवाड, सर्जेराव गाडेकर, लक्ष्मण गाडेकर, पांडुरंग गाडेकर, दत्तराव गाडेकर, शरद गाडेकर, सचिन गाडेकर, माजी सरपंच गुलाब गाडेकर, संजय गाडेकर, पांडूरंग सोळंके, आबासाहेब गाडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतला.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT