Parbhani News sakal
मराठवाडा

Parbhani News: साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी आमदार दुर्राणी यांचे उपोषण

परभणी यांनी यापूर्वी तीन वेळा श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा

सकाळ वृत्तसेवा

पाथरी : येथील श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती देण्यासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी (ता.२२) नागपूर येथील विधानभवनासमोर लाक्षणिक उपोषण केले.श्री साईबाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाथरी येथे तत्कालीन सरकारने जन्मभूमीचा विकास व्हावा, यासाठी निधी व मंजुरी बाबतची घोषणा केली होती. त्यासाठी नगरपरिषद पाथरी व जिल्हाधिकारी, परभणी यांनी यापूर्वी तीन वेळा श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता.(Parbhani News)

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत त्यास मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या शिखर समितीत त्यास अंतिम मंजुरी देण्यात येणार होती.

मुख्य सचिव अजय मेहता यांनी ता.१४ फेब्रुवारी २०२० रोजी सीताराम कुंटे यांनी ता. ४ जून २०२१ तर मनुकुमार श्रीवास्तव यांनी ता. २० सप्टेंबर २०२२ रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठका घेतल्या. परंतु, वारंवार त्रुटी दाखवीत सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.

त्यामुळे अद्यापपर्यंतही या आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळालेली नाही. श्री साईबाबांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारून मुख्य सचिव यांच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीस व पुढील कामास गती देण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी नागपूर येथील विधानभवनासमोर लाक्षणिक उपोषण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT