file photo 
मराठवाडा

परभणी : जेष्ठांच्या आरोग्याची केलेली सेवा ईश्वर सेवेप्रमाणे- शिवानंद टाकसाळे 

संजय मुंडे

वालूर ( जिल्हा परभणी ) : ग्रामीण भागातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन करुन जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने ईश्वर सेवा केल्याचे पुण्य प्राप्त होते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी (ता. २४) वालूर गावात केले. 

वालूर (ता. सेलू ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी कोरोना लसीकरण संदर्भात झालेल्या कार्यक्रमात नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी गावातील तरुणांसह जेष्ठ नागरिकांनी कोरोनाच्या लसीकरणास प्रतिसाद दिला. जेष्ठ नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव व्हावा म्हणून ही लस किती फायदेशीर आहे व ती लस प्रत्येक नागरिकांनी घेण्याचे आवाहन श्री  टाकसाळे यांनी केली.
यावेळी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने, जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ.विद्यासागर पाटील, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.रावजी सोनवणे, महिला व बालकल्यान अधिकारी एस. बी. कच्छवे, गणेश मुंढे, महम्मद ईस्माइल आदींची उपस्थिती होती.

आतापर्यंत ३८३ नागरिकांनी कोरोना लस घेतली. प्रास्ताविक डाॅ.रावजी सोनवणे यांनी केले. संचलन व आभार डाॅ.दिपक सावळे यांनी मानले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रकाश वाठोरे, डाॅ.दिपक सावळे, डाॅ.अक्षय डाके, डाॅ.योगिता मालाणी, सुहास सदावर्ते, परिवेक्षक वसंत पवार यांच्यासह आरोग्य कर्मचार्यांनी पुढाकार घेतला. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati NICU Deaths : अमरावती हादरलं! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग, ३ बालकांचा गुदमरून मृत्यू

मोठी बातमी! बाजार समिती कांदा लिलावासाठी खरेदी करणार बोरामणी हद्दीत ४० एकर जमीन; संचालक मंडळांची मंजुरी, आता पणन संचालकांच्या मान्यतेची प्रतीक्षा

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT