soybeans price sakal
मराठवाडा

Parbhani : सोयाबीनला गतवर्षीच्या तुलनेत २ ते ३ हजाराने भाव कमी

नैसर्गिक संकटे पार करीत जे हातात पडेल ते बाजारात आणले जात

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर : येथील मार्केट यार्डात सोयाबीन प्रति क्विंटल पाच हजार ३५१ रुपये भावाने विक्री झाले. गतवर्षीच्या तुलनेत हा भाव दोन ते तीन हजार रुपयांनी कमी आहे. तालुक्यात यावर्षी सोयाबीनचा पेरा अधिक होता. परंतु, यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे पेरणीपासून ते काढणीपर्यंत सोयाबीनची नासाडी झाली. नैसर्गिक संकटे पार करीत जे हातात पडेल ते बाजारात आणले जात असताना सोयाबीनला गतवर्षीच्या तुलनेत क्विंटल

मागे २००० ते ३००० हजार रुपयांचा फटका बसत आहे. महागाई प्रचंड वाढत असताना शेतमालाला मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. व्यापारी मात्र मोठ्या प्रमाणात खरेदी करून नफा कमवीत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यातील मार्केट कमिटीच्या आवारात दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात नव्याने सोयाबीनची आवक होत आहे. गुरुवारी ४४१ क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक होती. भाव मात्र ५,३५१ रुपयांच्या पुढे सरकत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. गतवर्षी सात ते आठ हजारांचा पल्ला गाठलेल्या सोयाबीनला आणखीन भाव मिळेल या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन अजूनही घरातच आहे.

नव्याने सोयाबीन बाजारात आल्यानंतरही भाव मात्र स्थिर नसल्याचे सध्याचे चित्र आहे. सोयाबीनच्या तुलनेत मूग आणि उडीद या पिकाच्या भावात चढ उतार नेहमीसारखाच सुरू आहे .शेतकऱ्यांमध्ये आता रब्बीची तयारी करण्याची लगबग सुरू झाल्यामुळे आर्थिक अडचणीतून जावे लागत असल्याने मिळेल त्या भावातच सोयाबीनची विक्री करताना दिसत आहेत. यातच दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलींना सासरी पाठविण्यासाठी नवीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारात आणून विक्री करावी लागत आहे. बाजार समितीच्या अडत बाजारात दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर पाच हजारच्या वरील भाव गेला नाही. आवक मात्र मोठ्या प्रमाणात नसल्याने येथील सोयाबीनचा भाव कमी जास्त होत आहे. त्यामुळेच शेतकरी आपले सोयाबीन बाजारात आणून फडीवर विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणताना दिसत आहेत.

कापसालाही भाव नाही

एमआयडीसीमध्ये त्रिलोक कॉटन येथे २६ ऑक्टोबरपासून खरेदी चालू झाली असून, आवक २६०० क्विंटल होती. भाव सात हजार नऊशे अकरा रुपये एवढा मिळाल्याने शेतकऱ्यांमधून कापूस विक्रीसाठीही भाव नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कापूस लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. दोनच वेचणीत कापसाच्या पराट्या झाल्या. त्यातच भाव नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकट सतावत आहे.

सोयाबीनला एक किंवा दोन महिन्यानंतर सात ते आठ हजार रुपये भाव मिळण्याची आशा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी घाई करू नये.

- सतीश काळे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT