file photo 
मराठवाडा

परभणी : जेष्ठांचे लसीकरण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा- सीईओ शिवानंद टाकसाळे 

गणेश पांडे

परभणी : कोरोनाच्या प्रादुर्भावा पासून जेष्ठ मंडळींचे सरंक्षण व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.

परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण या ग्रामपंचायती मध्ये  65 वर्षे वयो गटावरील जेष्ठ नागरिकांसाठी कोविड - 19 लसीकरणाचे आयोजन 30 मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

जेष्ठ मंडळी व गावातील नागरिकांशी संवाद साधताना टाकसाळे म्हणाले की, आपल्या वाड वडिलांची सेवा करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्यमान कसे उंचावता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे जेष्ठ मंडळींचे शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी युवकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच टाकसाळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, गट विकास अधिकारी अनुप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रावजी सोनवणे, सरपंच प्रभुलाल जैस्वाल, माजी उपसभापती गिन्यांनदेव दंडवते, माजी जिल्हा परिषद सदस्य टी एम सामाले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, ग्राम विकास अधिकारी पंजाब देशमुख, स्वच्छ भारत मिशन कार्यालयाचे ज्ञानेश्वर गायकवाड, परमेश्वर हलगे, आरोग्य विभागाचे सोमवंशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ता. 1 एप्रिल पासून 45 वर्ष वयोगटा वरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवर्जून लस घ्यावी.

- शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : जालन्यात मराठा समाज बांधवांची बैठक

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

Umarga Crime : तरुणाच्या खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक; उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

SCROLL FOR NEXT