Suspension  esakal
मराठवाडा

Parbhani : चार वैद्यकीय अधिकारी निलंबित, परभणीच्या सीईओंची कारवाई

असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या चार विविध आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी निलंबनाच्या कडक कारवाईचा बडगा उगारला.

​गणेश पांडे

परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांना अपुरी वैद्यकीय सेवा देणाऱ्या आणि मिशन कवच कुंडल अभियानाअंतर्गत लसीकरणातील असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या चार विविध आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिवानंद टाकसाळे (Parbhani Zilla Parishad) यांनी बुधवारी (ता.दहा) निलंबनाच्या कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. टाकसाळे यांनी संबंधितांना आढावा बैठकीमध्ये वेळोवेळी सूचना देऊन, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या भेटी दरम्यान कामात अनियमितता दिसून आली. तसेच संबंधित अधिकारी कार्यालयात मद्यप्राशन करून येत असल्याने आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली. या बाबत संबंधितांना करणे दाखवा नोटीस बजावून देखील त्यांच्या गैरवर्तनात कसल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने सदरची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये डॉ. प्रकाश किशनराव वाठोरे (प्राथमिक आरोग्य केंद्र वालूर, ता.सेलू) यांना कार्यालयीन वेळेत शासकीय इमारतीत मद्यपान करून येणे (Parbhani) आणि मिशन कवच-कुंडल अभियानाअंतर्गत लसीकरणाच्या कामात असमाधानकारकता असणे, डॉ. अविनाश बाबुराव राजूरकर (प्राथमिक आरोग्य केंद्र वाघाळा ता. पाथरी) यांना लसीकरणाच्या कामातील असमाधानकारकता आणि वर्तनातील सुधारणा होत नसल्याने, सामाजिक असंतोष वाढल्याने, डॉ. विष्णू दगडू माने (प्राथमिक आरोग्य केंद्र, राणीसावरगाव) यांना जनतेच्या तक्रारीवरून मुख्यालयी राहून आरोग्य सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना देत नाहीत.

तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याने तर डॉ. कृष्णदास पळशीकर (प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव, ता. पाथरी) यांना वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा झाली नसल्याने, शासकीय वेळेत मद्यपान करून येत असल्याने आणि मिशन कवच - कुंडल अंतर्गत कामात प्रगती न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी निलंबनाची कारवाईही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर केली आहे. राणीसावरगाव, बाभळगाव सारख्या ग्रामपंचायतीनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय सुविधेपासून वंचित ठेवणाऱ्या आणि समाजहित विसरलेल्या अधिकाऱ्यांनी वेळीच सावध होऊन आपले काम प्रामाणिकपणे करण्याची चेतावणी शिवानंद टाकसाळे (IAS Shivanand Taksale) यांनी दिली आहे.

कारवाई करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून कायमस्वरूपी काढून टाकण्या बाबतचा प्रस्ताव आपण लवकरच आरोग्य विभाचे आयुक्त यांच्याकडे पाठवणार आहोत. तसेच यापुढे देखील कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे

- शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaniwarwada Namaz Controversy : शनिवारवाड्याच्या वादावरून रूपाली ठोंबरेंचा खासदार मेधा कुलकर्णींसह पोलिसांना मोठा इशारा, म्हणाल्या...

Rohit Sharma विरुद्ध मिचेल स्टार्कने खरंच 176.5 Kmph वेगात बॉल टाकला? जाणून घ्या सत्य काय

Diwali 2025: दिवाळीत कमी वेळेत काढा फुलांच्या सुंदर रांगोळ्या, एका क्लिकवर पाहा खास रांगोळी डिझाइन्स

Mokhada Rain Damage : परतीचा पाऊस ही ऊठला शेतकर्याच्या मुळावर, मोखाड्यात कापणीला आलेले भात शेतातच आडवे

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या

SCROLL FOR NEXT