Parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani : परभणीकरांनी अनुभवले अनोखे चंद्र-ज्येष्ठा पिधान

आकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी दुर्मिळ अशी पिधान युती सोमवारी (ता.पाच) पहाटे परभणीकरांनी अनुभवली. पहाटे ५ वाजून ४६ मिनिटांनी चंद्र - ज्येष्ठा पिधान चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू झाले.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : आकाशात घडणाऱ्या वेगवेगळ्या खगोलीय घटनांपैकी दुर्मिळ अशी पिधान युती सोमवारी (ता.पाच) पहाटे परभणीकरांनी अनुभवली. पहाटे ५ वाजून ४६ मिनिटांनी चंद्र - ज्येष्ठा पिधान चंद्राच्या तेजस्वी बाजूने सुरू झाले. सकाळी ६ वाजून ३ मिनिटांला त्याचा मोक्ष चंद्राच्या काळोख्या बाजूने झाला.

आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, परभणी येथे परभणी एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सदस्यांनी या पिधानाचे निरीक्षण केले. त्याबाबत नोंदी घेतल्या. यावेळी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सर्व सदस्य व खगोल प्रेमी उपस्थित होते. चंद्रबिंब जेव्हा एखाद्या तारकेला किंवा ग्रहाला आच्छादून पुढे जाते. तेव्हा त्याला पिधान युती म्हणतात. दोन ग्रहांमध्ये किंवा ग्रह आणि ताऱ्यामध्ये पिधान युती होऊ शकते. ज्येष्ठा हा आकाशगंगेतील तांबडा महाराक्षसी तारा असून रात्रीच्या आकाशातील सोळाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा असून तो आपल्याला ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे.

वृश्चिक राशीतील त्याचा तारकासमूह ज्येष्ठा नक्षत्र या नावाने ओळखला जातो. ज्येष्ठा तारा साध्या डोळ्यांना दिसणाऱ्या ताऱ्यांमधील एक प्रचंड मोठ्या आकाराचा तारा आहे. चंद्र, पृथ्वी आणि ज्येष्ठा यांच्यामध्ये साधारण पाच वर्षात जवळपास ५५ वेळेला हा पिधानाचा योग येतो आणि त्यानंतरच्या १४ वर्षात मात्र तो एकदाही येत नाही.

या पाच वर्षांच्या कालखंडात ५५ वेळेला अशा प्रकारचे पिधान लागताना दिसते आणि नंतरच्या चौदा वर्षात या विधानाला खंड पडतो. या वेळचे पिधान चक्र २०२३ ते २०२८ आहे. योगायोगाने यावर्षीच्या पिधान चक्रात ५६ पिधान आहेत. त्यातले ५६ पैकी पाच पिधान भारतातून दिसणार आहेत. त्यातही ३ पिधान दिवसा व २ पिधान रात्री असतील.

दुर्मिळ असे पिधान सोमवारी पहाटे अनुभवण्यात आले. अशाच प्रकारच्या अनोख्या खगोलीय घटनांचा या केवळ विज्ञानाच्या दृष्टीने पहिल्या पाहिजेत व त्याचा आनंद घेतला पाहिजे

— डॉ. रामेश्वर नाईक,

अध्यक्ष. परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT