parbhani News
parbhani News 
मराठवाडा

Video : तू चाल गड्या... तुला रे भीती कशाची? पर्वा ही कुणाची?

गणेश पांडे

परभणी : अनेक वर्षांपासून फोटोग्राफीचा व्यवसाय करून कुटुंबाचा रहाटगाडा चालविणाऱ्या परभणीतील उमद्या तरुण प्रशांत यस्के यांच्यावर चक्क भाजीपाला विक्रीची वेळ आली आहे. टाळेबंदीमुळे फोटोग्राफीचा व्यवसाय बंद पडल्याने या तरूणांने हार न मानता सरळ भाजीपाल्याचा व्यवसायातून उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे. या तरुणांचा हा प्रयत्न शहरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

कोरोनानंतर जग बदलणार, कोरोना संकटानंतर अनेकाच्या नोकऱ्या जातील, व्यवसाय बुडतील आणि जगाला आर्थिक मंदीला तोंड द्यावे लागेल, अशी भीती जाणाकारांकडून व्यक्त केली जात आहे. हे काही अंशी खर ठरत असल्याचे दिसते. कारण सलग ६५ दिवसांच्या टाळेबंदीनंतर अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत. त्यात फोटोग्राफी या व्यवसायालादेखील कोरोनाच्या संकटाची झळ पोचली आहे. खरतर मार्च ते जून हे फोटोग्राफरच्या कमाईचा काळ असतो. या दिवसांत लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे फोटोग्राफर व्यावसायिक या हंगामासाठी अधिच तयारी करून ठेवतात. त्यासाठी अनेक जण कर्ज काढून लग्न समारंभासाठीचे सिजन साजरा करतात. यातून वर्षभराचे उत्पन्न या फोटोग्राफरला होत असते. परंतु, यंदाच्या कोरोना विषाणू संसर्गामुळे ता. २३ मार्चपासून देशात टाळेबंदी करण्यात आली आहे.  

हेही वाचा - लॉकडाउनचा असाही फायदा : बालविवाहाचा धडाका -

भाजीपाला विक्रीस सुरवात
या टाळेबंदीमुळे फोटोग्राफी व्यावसायिकांच्या स्वप्नावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे हजारो फोटोग्राफर व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परभणीतील प्रशांत यस्के या उमद्या तरुणांने फोटोग्राफी व्यवसायात अल्पावधीतच नाव कमविले आहे. परंतु, या कोरोना विषाणू संसर्गानंतर प्रशांत यस्के याचा फोटोग्राफीचा व्यवसायच ठप्प पडला. लग्न सिजनसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता प्रशांतच्या समोर होती. परंतु, या विपरित परिस्थितीतीतही हार न मानता प्रशांत यस्के याने सरळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. टाळेबंदीमुळे फोटोग्राफी बंद असल्याने भाजीपाला विक्रीतून कमाई करून घर चालवावे, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याने स्वताःच्या चारचाकी गाडीतून भाजीपाल्याचे कॅरेट टाकून कॉलन्या, कॉलन्यांमध्ये फिरून भाजीपाला विक्रीस सुरवात केली आहे.

दिवसाकाठी विक्री होतो तीन हजारांचा भाजीपाला
प्रशांत यस्के या तरुणाने ही शक्कल लढवित. कॉलन्या-कॉलन्यांमध्ये फिरून भाजीपाला विक्रीस सुरवात केली. कारमध्ये भाजीपाला विक्रीस येत असल्याचे समजल्यानंतर कॉलनीतील रहिवाशांनीदेखील त्याच्यावर विश्वास दाखवत त्याच्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला आहे. दररोज अडीच ते तीन हजार रुपयांचा भाजीपाला शहरात विक्री केल्या जात आहे.

हेही वाचा - नृत्यातून आनंदी जीवन जगण्याचा विद्यार्थ्यांचा संदेश... -

सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर
भाजीपाला विक्री करत असताना भाजी घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून भाजीपाला घेण्याचे आवाहन केले जाते. इतकेच काय तर भाजीपाला घेण्या आधी ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझर टाकूनच मगच त्यांना भाजी दिली जाते. प्रशांत यस्केच्या या स्वच्छतेचेदेखील लोक कौतुक करीत आहेत.

येथे क्लिक कराच -  परभणी जिल्ह्यात रविवारी दोघे पॉझिटिव्ह

 

घर चालविण्यासाठी व्यवसायाची निवड
मी फोटोग्राफर आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश कॉलन्यांमधील रहिवाशांची माझी थेट ओळख आहे. या ओळखीचा फायदा मला माझ्या या नवीन व्यवसायात होत आहे. फोटोग्राफी ही माझी अंगभूत कला आहे. ती कधीच मरणार नाही. परंतु, सध्याच्या घडीला घर चालविण्यासाठी मी हा व्यवसाय निवडला आहे.
- प्रशात यस्के, फोटोग्राफर, परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मनसे, ठाकरे गटाचा अर्ज

SCROLL FOR NEXT