Pralhad Barwal sakal
मराठवाडा

Phulambri News : वादळी वाऱ्यामुळे पत्रे व भिंतीखाली दबून एकाचा मृत्यू

फुलंब्री तालुक्यातील आडगाव भूमे येथे वादळी वाऱ्यात आडोशाला थांबलेल्या एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा पत्रे व भिंतीखाली दबून दुर्दैवी मृत्यू.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील आडगाव भूमे येथे वादळी वाऱ्यात आडोशाला थांबलेल्या एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा पत्रे व भिंतीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. प्रल्हाद दलसिंग बारवाल (वय-५०, रा. गंगाबाईचीवाडी, कान्होरी, ता. फुलंब्री) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यात शुक्रवारी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेच्या दरम्यान जोरदार पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली होती. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जाणाऱ्या येणारी नागरिक आडोशाला थांबत होते. गंगुबाईचीवाडी कान्होरी येथील प्रल्हाद बारवाल व सुपडूसिंग बहुरे हे दोघे आडगाव भूमे परिसरात विहिरीचे काम करण्यासाठी गेले होते.

अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने प्रल्हाद बारवाल व सुपडूसिंग बहुरे हे आडगाव पुणे येथील सुधाकर जयवंत भूमे यांच्या घरासमोर असलेल्या पत्राच्या आडोशाला थांबले. मात्र वाऱ्याचा वेग वाढल्याने दुमजली असलेल्या या इमारतीचे पत्रे समोरच्या पत्रावर पडले.

तसेच समोरील पत्रावरही दुमजली असलेल्या भिंती पडल्याने प्रसंगावधान साधत सुपडूसिंग बहुरे हे घरात घुसले. मात्र प्रल्हाद बारवाल यांना हलताच आले नाही. दुर्दैवाने पत्रावर भिंत कोसळल्याने खाली दबून प्रल्हाद बारवाल्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्याचे परिसरात माहिती होताच गावातील नागरिकांनी धावाधाव केली.

त्यानंतर पत्राचे वजन जास्त असल्याने जेसीबीच्या साह्याने पत्रे बाजूला करून त्याखाली दबलेले प्रल्हाद बारबल यांना बाहेर काढले. सदरील घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी ग्रामीण रुग्णालयात प्रल्हाद बारवाल यांना दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. रात्री सात वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात प्रल्हाद बारवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या अन् पेट्रोल टाकूनही जाळलं!

Horoscope 2026 : मेष ते मीन राशीपर्यंत..! 2026 वर्ष तुमच्यासाठी कसे असेल? वाचा नव्या वर्षाचं संपूर्ण वार्षिक राशिभविष्य

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

PCMC Election: अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या पक्षाची एन्ट्री होणार? निवडणुकीसाठी नवा डाव टाकला

Solapur News : "पोलिसात दाखल गुन्ह्यातील सर्वाधिक गुन्हे हे दारूचे"- पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे!

SCROLL FOR NEXT