कापूस
कापूस  
मराठवाडा

बिटी कपाशीवर यंदाही गुलाबी बोंडअळी

कृष्णा जोमेगावकर

नांदेड  : जिल्ह्यातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याचे प्रमाण काही ठिकाणी चार ते पाच टक्के, तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक आढळून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या अळीचे नियंत्रण करण्याचे आवाहन नांदेड कापूस संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रा. शिवाजी तेलंग यांनी केले आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राकडून गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाबाबत वेळोवळी निरीक्षक सुरु आहे. या केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रा. शिवाजी तेलंग यांनी कंधार तालुक्यातील अांबुलगा, गौळ, बिजेवाडी, फुलवळ या गावांतील शेतकऱ्यांच्या कपाशीची पाहणी मंगळवारी (ता. १९) केली. या वेळी त्यांना गुलाबी बोंडअळीचे प्रादुर्भाव दिसुन आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना अळिच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. बी. पुलकुंडवार, वरिष्ठ संशोधन सहायक जी. पी. सोनुले, प्रकल्प सहायक व्ही. के. जाधव उपस्थित होते.

पाहणी दरम्यान, कपाशीवर चार ते पाच टक्के गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. तसेच कामगंध सापळ्यात चार ते पाच पतंग आढळून आले. कपाशीची सध्या पाहिली वेचणी चालू आहे. शिल्लक राहिलेल्या १५ ते २० बोंडांत गुलाबी बोंडअळी येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात.


निंबोळी अर्काची फवारणी करावी


शेतकऱ्यांनी दीड टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, ट्रायकोग्रामा बॅक्टरिया या परोपजिवी किडीचे एकरी तीन कार्ड याप्रमाणे वापर करावा, परोपजिवी किडीची उपलब्धता उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, धनेगाव येथे उपलब्ध असल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, हेक्टरी पाच कामगंध सापळ्यांचा वापर करून त्यात नवीन पेक्तीनो लूरचा वापर करावा, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर स्पिनोसड चार ईसी चार मिली किंवा सायपर मिथ्रिन दहा टक्के ईसी दहा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, दुसऱ्या वेचणीनंतर कपाशीचे फरदड न ठेवता कापूस काढून दुसरे पीक घ्यावे. यामुळे पुढील वर्षी गुलाबी बोंडअळी येण्याची शक्यता कमी राहील, असे त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT