जालना ः जप्त केलेल्या गावठी पिस्तुलासह पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधीकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक संजय देशमुख व इतर.
जालना ः जप्त केलेल्या गावठी पिस्तुलासह पोलिस अधीक्षक चैतन्य एस., अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधीकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक संजय देशमुख व इतर.  
मराठवाडा

जालन्यात सापडले पुन्हा गावठी पिस्तूल 

सकाळ वृत्तसेवा

जालना -  शहरातील जुना मोंढा परिसरातून गुरुवारी (ता. पाच) रात्री एका संशयिताला गावठी पिस्तुलासह सदर बाजार पोलिसांनी पकडले आहे. अनिरुद्ध मारुती शेळके (वय 23, रा. माऊलीनगर, जालना) असे या संशयिताचे नाव आहे. 

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गावठी पिस्तूल सापडण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत पोलिसांनी आठ गावठी पिस्तूल जप्त केल्या आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखा, एडीएसपाठोपाठ आता सदर बाजार पोलिसांना गुरुवारी (ता. पाच) रात्री उशिरा गावठी पिस्तुलासह एकास पकडले आहे.

सापळा रचून पकडले
सदर बाजार पोलिसांना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून शहरातील जुना मोंढा परिसरात अनिरुद्ध मारुती शेळके याला गावठी पिस्तुलासह पकडले; तसेच त्याच्याकडून एक दुचाकीही जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी दिली आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संयज देशमुख, उपनिरीक्षक रमेश रूपेकर, कर्मचारी समाधान तेलंग्रे, संदीप बोंद्रे, साई पवार, सुधीर वाघमारे, सोपान क्षीरसागर, फुलचंद गव्हाणे, किरण चेके, महिला कर्मचरी प्रियांका बोरकर यांनी केली. 

आठवी गावठी पिस्तूल जप्त 
जानावेरीपासून आतापर्यंत जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेने पाच, तर एडीएसच्या पथकाने दोन गावठी पिस्तूल जप्त केल्या आहेत. तर आठवी गावठी पिस्तूल सदर बाजार पोलिसांनी जप्त केली आहे. 

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखा, एडीएसकडून कारवाया होत आहेत; मात्र स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अशा कारवाया करणे अपेक्षित आहे. अर्थात, सदर बाजार पोलिसांनी केलेली ही कारवाई अभिनंदनीय आहे. 
- चैतन्य एस., 
पोलिस अधीक्षक, जालना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT