Police
Police 
मराठवाडा

तृतीयपंथीयांच्या गोंधळामुळे पोलिसच पळाले ठाण्यातून!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - अटकेत असलेल्या एका रिक्षाचालकाला भेटण्यासाठी आलेल्या  तृतीयपंथीयाची साफसफाई करणाऱ्याने छेड काढली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध त्याने तक्रार दिली; पण पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. परिणामी, इतर तृतीयपंथीय ठाण्यात जमले आणि त्यांनी पोलिसांवर दबाब टाकत रात्रभर गोंधळ घातला.

शिवाय तोडफोड करीत कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना पळ काढावा लागला. हा प्रकार बुधवारी (ता. सात) रात्री उस्मानपुरा पोलिस ठाण्यात घडला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पकडलेल्या रिक्षाचालकाला  भेटण्यासाठी एक तृतीयपंथीय पोलिस ठाण्यात आला. त्यावेळी साफसफाई करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या एका खबऱ्याने त्याची छेड काढली. त्यावर रागावलेल्या तृतीयपंथीयाने गुन्हा नोंदवण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी दाद दिली नाही. 

या घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिस ठाण्यात शहरातील अनेक तृतीयपंथीय जमा झाले. त्यांनी धुडगूस घालत पोलिस ठाण्यात फर्निचरची  तोडफोड केली. पोलिसांची कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकली. हा गोंधळ रात्रभर चालला. तृतीयपंथीयांचा हा धिंगाणा पाहून पोलिसही चक्रावले. त्यांना आवरणे कठीण झाल्याने पोलिसांना पोलिस ठाण्यामधून काही काळ पळ काढावा लागला. पहाटे अतिरिक्त फौजफाटा बोलावून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले.

छेड काढणारा पळाला
ज्याने छेड काढली तो खबऱ्या पोलिस ठाण्याच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. उडी मारल्यामुळे एका कारची काचही फुटली. खबऱ्या अद्याप फरारी आहे. याप्रकरणी सहा तृतीयपंथीयांविरोधात गुरुवारी (ता. आठ) गुन्हा नोंदविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT