file photo
file photo 
मराठवाडा

मोक्कातील ‘या’ आरोपीला पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील मटका माफिया व मोक्कातील आरोपी कमल यादव याला औरंगाबाद मोक्का न्यायालयाने मंगळवारी (ता. १७) डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्‍वर धुमाळ यांनी त्याला सोमवारी (ता. नऊ) केले होते न्यायालयासमोर हजर.

शहराच्या वजिराबाद परिसरात असलेल्या दिलीपसिंग कॉलनी भागात ता. पाच सप्टेंबरच्या रात्री हवेत गोळीबार करून दहशत पसरविली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. यातील शेख अन्वर अली अकबर अली, प्रदीप उर्प सोनु लालचंद्र रौत्रे या दोघांना अटक केली होती. त्यानंतर समोर आलेल्या घटनाक्रमानुसार यात रणवीरसिंग उर्फ कालु उर्फ टायगर उर्फ शेरा उर्फ विलास उर्फ देविदास नामदेव पवार आणि विक्रम उर्फ विक्की नंदलाल यादव या दोघांना अट केली. हे चारही जण सध्या कारागृहात आहेत. या गुन्ह्यातील कमल गणेशलाल यादव याला अटक केली होती. 

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशावरून मोक्का

या पाच आरोपींविरुध्द विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी नांदेड पोलिसांच्या आलेल्या अहवालावरून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियमानुसार (मोक्का) लावण्याची परवानगी दिली. यावरून या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र यातील कमल यादव फरार होता. त्याला अटक करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना दिल्या. यावरून श्री. डोईफोडे यांनी आपले सहकारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल नाईक यांनी आपल्या पथकासह कमल यादव याची माहिती गोळा केली. तो जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पथकांनी जालना येथे रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून कमल यादव याला अटक केली.

सोमवारी (ता. नऊ) मोक्का न्यायालयासमोर केले हजर: 

कमल यादव हा सप्टेंबरपासून फरार होता. याला वजिराबाद पोलिस निरीक्षक संदिप शिवले यांच्या ताब्यात दिले होते. सोमवारी सकाळी डीवायएसपी श्री. धुमाळ यांनी कमल यादवला सोबत घेऊन औरंगाबाद मोक्का न्यायालयात हजर केले होते. तपास उपविभागीय अधिकारी (शहर) सिध्देश्‍वर धुमाळ करीत आहेत. !
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT