Police memorial day in Nanded
Police memorial day in Nanded  
मराठवाडा

नांदेड: पोलिस स्मृतीदिनी शहिद जवान व पोलिसांना मानवंदना

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्तव्य कठोर खात्यात कार्यरत असतांना विविध हल्ल्यात अनेक भारतीय सैनिक शहीद झाले. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व कर्तव्यावर असलेल्या जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी रविवारी (ता. 21) या दिवशी पोलिस स्मृतीदिन म्हणून देशभर साजरा करण्यात आला. या निमित्त नांदेडच्या पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयावरील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून पोलिस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना दिली.   

आदरांजलीपर आपल्या मनोगतात पोलिस अधिक्षक श्री. जाधव म्हणाले की, पोलिस व जवान हा कायमच दुर्लक्षित घटक राहिला आहे. दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी, गुन्ह्यांचे वेगवेगळे स्वरूप, वाढते कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्‍न यामुळे कामाचा प्रचंड ताण असल्याने त्यांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर तसेच कुटंबियावर दुष्परिणाम होत आहे. अशा अनेक विपरीत परिस्थितीत देखील ‘सदरक्षणाय्- खलनिग्रहणाय्' या ब्रीदवाक्याचा ते खंबीरपणे आपले कर्तव्य बजावीत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्मृतीदिनानिमित्त डीवायएसपी ए. जी. खान (गृह), इतवाराचे धनंजय पाटील, परिविक्षाधीन डीवायएसपी अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक साहबेराव नरवाडे, संदिप शिवले, पंडीत कच्छवे, अनिरूध्द काकडे, द्वारकादास चिखलीकर, रापोनि एस. आर. पोकळे, एपीआय अशोक लाटकर, यांच्यासह जवळपास ५०० कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. सुत्र संचलन हवादार विठ्ठल कत्ते यांनी केले तर शहिदांच्या नावांचे वाचन अश्विनी शेंडगे आणि धनंजय पाटील यांनी केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT