file photo 
मराठवाडा

जुगार खेळणाऱ्या व्यापाऱ्यांना अटक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः अंदर - बाहर नावाचा जुगार पैशावर खेळणाऱ्या पाच व्यापाऱ्यांना सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या पथकाने सोमवारी (ता. आठ) रात्री रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर नवामोंढा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी एकूण पाच लाख ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
परभणी शहरातील वकील कॉलनी परिसरातील एका ठिकाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे व त्यांचे सहकारी जावेद खान, प्रशांत वावळे, निलेश कांबळे, श्‍याम कुरील यांना शहरात गस्त घालत असतांना मिळाली. त्यांनी याची माहिती तातडीने सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना दिली.

रात्री उशिरा गुन्हा दाखल

श्री. बगाटे यांनी तातडीने या ठिकाणी रात्री सात वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता. या ठिकाणी शहरातील काही बडे व्यापारी अंदर-बाहर नावाचा पत्यावर पैसे लावून जुगार खेळत होते. पोलिसांनी या ठिकाणावरून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह दोन लाख सव्वीस हजार तीनशे पन्नास रुपये रोख, विदेशी चलनातील १२ नोटा, चार मोटारसायकली, सहा मोबाइल, असा एकूण पाच लाख ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसभर शहरात चर्चा
ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलिस हवालदार जावेद खान, पोलिस शिपाई प्रशांत वावळे, निलेश कांबळे, चालक श्‍याम कुरील यांनी मिळून केली. या छाप्याची सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर शहरात चर्चा होती.

बांधावरून 'रान' पेटले
सोनपेठ  (जि.परभणी) ः पेरणीचा हंगाम सुरू होताच गावोगाव बांधांचे व रस्त्यांचे रान पेटले असून दररोज होणाऱ्या या भांडणामध्ये अनेकजण गंभीर जखमी होत असल्यामुळे अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मागील एक आठवड्यात तब्बल दहा प्रकरणांची पोलिसांनी नोंद घेतली असून यापैकी आठ प्रकरणांत अदखलपात्र, तर दोन गुन्ह्यांत दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सोनपेठ तालुक्यातील ता. तीन मे रोजी नरवाडी येथे चिंचेचे झाड तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोनजण गंभीर जखमी झाले होते. तर ता. चार रोजी डीपी चालू करण्याच्या कारणावरून महातपुरी (ता. गंगाखेड) येथे भांडण झाले, ता. पाच रोजी डिघोळ येथे रस्ता वापरण्यावरून, ता. सहा रोजी धुऱ्यावरून ट्रॅक्टर गेल्याच्या कारणावरून गवळी पिंपरी येथे, तर शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून शिर्शी येथे शेतकऱ्यांमध्ये भांडण झाले. तसेच शिरोरी येथे ता. सात रोजी विहिरीच्या कारणावरून दोन गटांत गंभीर स्वरूपाचे भांडण झाले आहे. यामध्येदेखील परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावोगाव शेतीच्या हद्दखुना व रस्ते कायम करून दिलेल्या नसल्याने दरवर्षी असे वादाचे व क्वचित प्रसंगी जीवघेणे भांडण होत आहेत.

कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्याची मागणी
संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांना या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. या भांडणातून असंख्य शेतकरी कायमचे अपंग होतात, तर या वादातून असंख्य घर व कुटुंबे उद्‍ध्वस्त होतात. या गंभीर विषयाकडे शासनाने तत्काळ लक्ष देऊन शेतातील रस्ते, हद्दखुणा कायम करून देऊन हा कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्याची मागणी काही शेतकऱ्यांमधून होत आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT