Shindi News.png 
मराठवाडा

शिंदी निर्मिती अड्ड्यावर पोलिस पथकाची धाड

अभिजीत महाजन


सगरोळी, (ता. बिलोली, जि. नांदेड) ः सगरोळी (ता. बिलोली) येथे शेतात रसायनमिश्रित शिंदी तयार केली जात असल्याची खबर पोलिसांना मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. सर्वच राज्यांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. तरीही परिसरात मोठ्या प्रमाणात शिंदी व दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तेलंगणात शिंदीची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्याने मांजरा नदीपात्रातून चोरट्या मार्गाने शिंदीची आयात होत असून विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांची मागणी व बंद काळात अधिक पैसा कमावण्याच्या हेतूने सगरोळी येथेच रसायनमिश्रित शिंदीची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी पोलिसांच्या वतीने कठोर पावले उचलली जात आहेत, तरीही बंद काळात मोठ्या प्रमाणात बनवत शिंदी व दारूची विक्री होत आहे. 

या काळात बिलोली पोलिसांनी दोन वेळेस धाडी टाकून शिंदी बनविणाऱ्या चोरट्यांना पकडून गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, येथे एका शेतात रसायनमिश्रित शिंदी बनविण्याचा अड्डा असल्याचा पोलिसांना सुगावा लागला होता. बुधवारी (ता. १५) मध्यरात्री बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येथील सतीश गोविंद गौड यांच्या आखाड्यावर धाड टाकली असता, रसायनमिश्रित शिंदी निर्मितीसाठी लागणारे साहित्य, रासायनिक पदार्थ, मोटार सायकल असा अंदाजित ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी. आर. तायवडे यांच्या फिर्यादीवरून सगरोळी येथील आरोपी सतीश गौड, बालाजी दुबकलोड, गंगाधर मामडे यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले असून दोन आरोपींना मुद्देमालासह रात्रीच अटक करण्यात आली, तर एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रामदास केंद्रे हे करीत आहेत.

बंद काळात दारूची जोमाने विक्री
मागील अनेक वर्षांपासून येथे शिंदिची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शिंदी पिणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. अनेक वेळा पोलिसांनी छापे टाकले आहेत. तरीही शिंदीची विक्री मोठ्या प्रमाणत होत असते. यासह अनेक अवैध्य धंद्यांनी आपले डोके वर काढले आहे. सध्या देशी दारू दुकान बंद असल्याने परवाना धारकाने शक्कल लढवून विविध क्लुप्त्या वापरत घरपोच दारूची विक्री मोठ्या प्रमाणात चालू ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT