हिंगोली ः येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी (ता.तीन) शिक्षण, व अर्थ सभापतिपदाच्या खाते वाटपावरून राजकीय कुरघोडीमुळे सोमवारी (ता. तीन) जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गोंधळ घातल्याने ही सभा अध्यक्ष गणाजी बेले यांनी तहकूब केली. या सभेत सहा विषय समिती सभापतींचे खाते वाटप होणार होते. शिवाय शिक्षण सभापती, अर्थ सभापतिपदासाठी एकमत होत नसल्याने सभागृहात गोंधळ उडाला होता.
या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनिष आखरे, महिला बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर, कृषी सभापती रत्नमाला चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, नितीन दाताळ आदींची उपस्थिती होती. शिक्षण व अर्थ सभापतीसाठी रत्नमाला चव्हाण यांची निवड करावी, यासाठी अजित मगर यांच्यासह काही सदस्यांनी नाव सुचविले, तर बाजीराव जुमडे यांचे नाव संजय देशमुख यांनी सुचविले. त्याला बाळासाहेब देशमुख यांनी अनुमोदन दिले.
दोनदा गोंधळ मग सभा तहकूब
सभागृहात काही सदस्यांनी चांगलाच गोंधळ घातल्याने २.४० ला सुरू झालेली सभा तहकूब करून अध्यक्ष बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा ३.१० मिनिटांनी दुसऱ्यांदा सभा सुरू झाली. पुन्हा सभा तहकूब झाली. त्यानंतर दहा मिनिटांनी सभा सुरू झाली. परत मतदानाची प्रक्रिया करीत असताना दुसऱ्या गटाने मोकळ्या जागेत येऊन हात उंचावून गोंधळ घालण्यास सुरवात केल्याने शेवटी पीठासीन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर करून दालनाकडे निघून गेले.
घोषणाबाजी अन् नंतर ठिय्या आंदोलन
सभागृहात काही सदस्य विचारविनिमय करीत होते. त्यानंतर डॉ. सतीश पाचपुते, अजित मगर यांच्यासह काही सदस्यांनी सभा तहकूब केल्याचा निषेधार्थ आक्रमक पवित्रा घेत ‘नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी’, अशा घोषणा देत जिल्हा परिषद हादरून सोडले. नंतर गेटजवळ येत ठिय्या आंदोलन करीत पुन्हा घोषणाबाजी सुरू केल्याने आत व बाहेर मोठी गर्दी जमली होती.
हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळाला ‘बटाटा’ लागवडीतून आधार
शिवसेनेची राजकीय खेळी यशस्वी
जिल्हा परिषदेमध्ये मागील अडीच वर्षांपूर्वीदेखील महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. पुन्हा अडीच वर्षांनंतरदेखील सत्ता स्थापन करून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी पार पडल्या. मात्र, सभापतिपदासाठी कुरघोडीचे राजकारण करीत काँग्रेसच्या ताब्यातील समाज कल्याण सभापतिपद काढून घेत शिवसेनेने राजकीय खेळी करीत आपल्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे यासाठी काँग्रेसचा एक गट, राष्ट्रवादी एक गट, भाजपच्या एका गटाने पाठिंबा दिला होता. त्या वेळी एका पदासाठी दोन्ही गटांकडून अर्ज दाखल झाले होते. मात्र, एक गट अर्ज काढण्यास तयार होत नसल्याचे पाहून समाज कल्याण सभापतिपदासाठी शिवसेनेचे फकिरा मुंढे विजयी झाले.
तसाच काहीसा प्रकार या वेळी शिक्षण व अर्थ सभापतिपदासाठी झाल्याने सभागृहात काही सदस्यांनी गोंधळ घातल्याने विशेष सर्व साधारणसभा अखेर तहकूब करावी लागली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बेले यांना निवेदन
जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत दोन ते चार सदस्यांनी गोंधळ घातला. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी व आपण ही सभा तहकूब केली हे खऱ्या अर्थाने नियमबाह्य आहे, असे सांगून पुढील सभेची नोटीस काढून कळविण्यात यावे, असे डॉ. सतीश पाचपुते, अजित मगर, कैलास साळुंखे, सुनंदाताई नाईक, भगवान खंदारे यांच्यासह सात ते आठ सदस्यांनी अध्यक्ष गनाजी बेले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
हेही वाचा - ढगाळ वातावरणाने वाढली शेतकऱ्यांमध्ये चिंता
कायद्याप्रमाणे सभा अनिश्चित केली
जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा सुरू असताना चार-पाच सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे कायद्याप्रमाणे सभा अनिश्चित केली. सुरवातीला अर्धा तास वेळ दिला होता. मात्र, एकमत न झाल्याने ही सभा नाईलाजाने तहकूब करावी लागली. -गणाजी बेले, जिल्हा परिषद अध्यक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.