Bank Account Link Aadhaar esakal
मराठवाडा

हिंगोली : शेतकऱ्यांनो, बँक खाते आधार लिंक करा!

अन्यथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळणार नाही

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थींनी ३१ जुलैपर्यंत बँक खाती आधार संलग्न करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले. त्यांनी पत्रकात नमूद केले की, प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थींची ई-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवून ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना होत्या. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थींना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.

सद्यःस्थितीत सात जुलैअखेर राज्यातील आधार प्रमाणित १०६.६८ लाख लाभार्थींपैकी ६०.३५ लाख लाभार्थींचे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ४६.४४ लाख लाभार्थींचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित आहे. याबाबत केंद्र शासनाने दूरचित्रवाणी परिषदेमार्फत राज्यातील प्रलंबित ई-केवायसी ३१ जुलै अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. ज्या लाभार्थींचे ई-केवायसी पूर्ण होणार नाहीत त्यांना पुढील हप्त्याचे वितरण करण्यात येणार नाही. त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थींनी योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित वेळेत ३१ अखेर पर्यंत ई-केवायसी प्रमाणिकरण करून घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT