Pregnant Cow 
मराठवाडा

बैलपोळ्याच्या दिवशी गायीचे डोहाळेजेवण!

दीपक क्षीरसागर

उस्मानाबाद : शेतकऱ्यांचा आपल्या जनावरांवर विशेष जीव असतो. बैलपोळ्याच्या दिवशी सर्वच जनावरांची पूजा करण्यात येते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र, बैलपोळ्याचा मुहूर्त साधून उस्मानाबादमधील एका कुटुंबाने चक्क आपल्या गायीचे डोहाळेजेवण घातले.भड कुटुंबीयांकडे तीन वर्षांची गंगा नावाची एक गाय आहे.

ही गंगा पहिल्यांदाच माता होणार असल्याने आपल्या गाईचे डोहाळे जेवण करायचे, असे या कुटुंबीयांनी ठरवले. त्यासाठी दारात मांडव घातला गेला. सुवासिनींना निमंत्रण देण्यात आले.आणि एखाद्या महिलेचे करावे तसे आपल्या लाडक्या गंगा गायीचे डोहाळेजेवण अगदी विधिवत केले.

गंगेच्या या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाला आसपासच्या सुवासिनींनी गर्दी केली होती. लाडक्या गंगाला कार्यक्रमापूर्वी स्वच्छ अंघोळ घालण्यात आली. झुल, हार फुले, फुगे यांनी तिला सजवण्यात आले. डोहाळजेवणाच्या निमित्ताने दारात खास मंडप आणि रांगोळीही काढण्यात आली होती. एखाद्या महिलेसाठी जे जे करतात ते सर्व या गायीसाठी करण्यात आले. यावेळी महिलांनी गंगाची ओटीही भरली.

ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गंगाच्या समोर बसून महिलांनी तिच्या कोडकौतुकाची गाणीही म्हटली. एरवी गायीला माता मानून तिची पूजा केली जाते. भड कुटुंबियांनी मात्र, तिला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवून तिचे डोहाळेही पुरवले. बैलपोळ्याच्या दिवशी उस्मानाबाद शहरात गंगाच्या डोहाळेजेवणाचीच चर्चा होती.

थाटामाटात केला कार्यक्रम
लहानपणापासून सांभाळलेल्या गायीचं मला डाहाळेजेवण करण्याची खूप इच्छा होती. त्यानिमित्तानं चार लोकांना बोलावून जेवण घालायचं होतं. सातव्या महिन्यात मी गंगाचं डोहाळेजेवण केलं. माझी बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली.
- सौ. किरण भड, गायीच्या मालकीण
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT