जालना - गणपती नेत्रालयात सोमवारी झालेल्या कार्याक्रमात बोलताना राज्यपाल सी. विद्यासागरराव. व्यासपीठावर मान्यवर.
जालना - गणपती नेत्रालयात सोमवारी झालेल्या कार्याक्रमात बोलताना राज्यपाल सी. विद्यासागरराव. व्यासपीठावर मान्यवर. 
मराठवाडा

कौशल्य विकास केंद्राची प्रकिया सुरू - सी. विद्यासागर राव

सकाळवृत्तसेवा

जालना - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जालन्यात कौशल्य विकास केंद्र (स्किल डेव्हलपमेंट सेंटर) सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी २५ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती राज्यपाल सी. विद्यासागरराव यांनी दिली आहे. 

गणपती नेत्रालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त सोमवारी (ता. १७) आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी स्व. बद्रीनारायण बारवाले यांच्यावर लिखित ‘द कॉफी टेबल’ या पुस्तकाचे विमोचनही करण्यात आले. गणपती नेत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधांबाबत समाधान व्यक्त करीत प्रत्येक जिल्ह्यात नेत्रालयाची शाखा सुरू होण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये स्व. डॉ. बद्रीनारायण बारवाले हे सक्रिय होते, असे सांगत त्यांच्या विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण कार्यांचा गौरवही राज्यपालांनी केला. नेत्रालयाच्या माध्यमातून स्व. डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली. आतापर्यंत दोन लाख शस्त्रक्रिया; तर सात लाखांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली आहे. तसेच, या कार्यक्रमात दोन गावे अंधत्वमुक्त केल्याचे नेत्रालयाने यावेळी जाहीर केले.

या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, गणपती नेत्रालयाचे चेअरमन राजेंद्र बारवाले, वैद्यकीय संचालक डॉ. ऋषीकेश नायगावकर आदींची उपस्थिती होती. इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT