protest in nathsagar dam demand of cancellation of solar power project central govt jayakwadi project  Sakal
मराठवाडा

Solar Power Project : नाथसागर धरणातील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणात जलसमाधी आंदोलन

जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात होत असलेल्या केंद्र सरकारचा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणी बाबत जायकवाडी बचाव‌ मच्छीमार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.७)कहार समाजाच्या मच्छीमारांनी जलसमाधी घेण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.

चंद्रकांत तारु

पैठण :जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात होत असलेल्या केंद्र सरकारचा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणी बाबत जायकवाडी बचाव‌ मच्छीमार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.७)कहार समाजाच्या मच्छीमारांनी जलसमाधी घेण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.

या जलसमाधी आंदोलनात मोठ्या संख्येने कहार समाजातील पुरुष, महिला सहकुटुंब सहभागी झाले आहे.दरम्यान जलसमाधी आंदोलन रोखण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे. हे जलसमाधी आंदोलन करण्यासाठी दोन दिवसांपासुन मच्छीमारांचे कुटुंब सज्ज होवुन बसले होते.

तर काही लोक आंदोलनाच्या पुर्व संध्येलाच जायकवाडी धरणाच्या नाथसागराच्या परिसरात दाखल झाले होते.रात्रीचा मुक्काम या ठिकाणी करुन हे आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलनासाठी प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त या परिसरात तैनात केला आहे.

मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनसाठी ठाम असुन‌ नाथसागरातील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेवुन आदेश पारित करणार नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा मच्छीमार संघटनेने दिला आहे. दरम्यान,

नाथसागरात १५ हजार हेक्टर पाण्यावर हा सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो नागरिकांवर या प्रकल्पामुळे उपासमारीची वेळ येणार आहे.

या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी लवकरच होणार असल्याचे समजताच कहार समाजाने गेल्या दोन दोन महिन्यापासुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन प्रकल्प रद्द करण्याची मागणी लावुन धरली आहे.

आजच्या जलसमाधी आंदोलनामुळे धरणाच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी उसळ्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आंदोलकांच्या वाहने व महिला , पुरुष आंदोलकांच्या गर्दीने हा धरण परिसर व्यापुन गेला आहे.तर तालुका प्रशासनाचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT