tausif
tausif 
मराठवाडा

औरंगाबाद महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी निलंबित 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : वसुलीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी (ता.19) रात्री उशिरा काढले आहेत. वसुलीच्या कामात गंभीर नसल्यामुळे गेल्या आठवड्यातच आयुक्तांनी एकाला निलंबित केले होते. 

महापालिकेची शहरात मालमत्ता कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 450 कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र नऊ महिने संपले तरी 12 ते 15 टक्के एवढीच वसुली झाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी नऊ प्रभागातील बड्या थकबाकीदारांच्या याद्या तयार करून नऊ अधिकाऱ्यांवर वसुलीची जबाबदारी सोपविली आहे. मात्र त्यानंतरही वसुलीत वाढ होत नसल्याने गेल्या आठवड्यात संजय जक्कल यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा आयुक्तांनी जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांच्या निलंबनाचे आदेश काढले. 

चौघांवर केली कारवाई 
आयुक्तांनी यापूर्वी उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर अतिक्रमण प्रकरणी, मुख्य पशूसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्यामुळे तर कमी वसुलीमुळे जक्कल, तौसिफ यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

Russian Attack Video: रशियाच्या मिसाईल हल्ल्यात 'हॅरी पॉटरचा किल्ला' उद्धवस्त; 5 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT