photo
photo  
मराठवाडा

जिल्हाभरात पल्स पोलिओ लसीकरणास सुरवात  

नवनाथ येवले

नांदेड : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस रविवारी (ता. १९) सकाळी सुरवात झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर, मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामीण भगात विविध ठिकाणी बालकांना पल्स पोलिओची लस देवून मोहीमेचा शुभारंभ केला. 

जिल्हा परिषदेच्या मातब्बरांनी ठिकठिकाणी बालकांना लस देवून मोहिमेत सहभाग घेतला. जवळगांव (ता.हदगाव) येथे जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर यांनी बालकास पल्स पोलिओची लस दिली. कामठा (ता. आर्धापुर) येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते बालकास पोलिओ लस पाजून जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारांभ केला. या वेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, पंचायत समितीचे सभापती कांताबाई सावंत, जिल्हा परिषद सदस्य संगीता अटकोरे, उपसभापती अशोक कपाटे, सरपंच शिवलींग स्वामी, पंचायत समिती सदस्या मंगला स्वामी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. शिंदे, डॉ. शिवशक्ती पवार, साथरोग वैद्यकिय अधिकारी डाॅ. अनिल रुईकर, गटविकास अधिकारी मिना रावताळे, जिल्हा विस्तार व माध्यमिक अधिकारी सुभाष खाकरे आदींची उपस्थिती होती.  

लसीकरण मोहिमेस शुभारंभ 
जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस शुभारंभ प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे म्हणाले की, भावी पिढी ही सशक्त रहाण्यासाठी एकही बालक पोलिओच्या लसीपासून तसेच इतर लसींपासून वंचित रहाणार नाही. याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी, असे आहवान करत त्यांनी पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्व पटवून दिले. 

आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ 
जिल्हापरिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील चार लाख सात हजार ७०० बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हाभरात दोन हजार ७३३ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सात हजार १८२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी होत आहे लसीकरण  
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महापालिका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडीसह सार्वजनिक ठिकाणी बुथद्वारे पल्स पोलिओची लस देण्यात येत आहे. या शिवाय बस्थानक, रेल्वेस्टेशन परिसर या शिवाय मोबाईल टिमद्वारे दुर्गमभागातील विटभट्टी, उसतोडणी व स्थलांतरीत कामगार वस्त्यांवरील बालकांना पल्स पोलिओची लस देण्यात येत आहे. मोहिमेपासून वंचित राहीलेल्या बालकांना आय. पी. आय. कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस गृहभेटीद्वारे लस दिली जाणार आहे. 

पल्स पोलिओची लस घ्यायलाच हवी 
पोलियो अथवा पोलियोमायलिटिस हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलियोच्या उपसर्गाच्या ९० टक्के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत. परंतू, विषाणूंनी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. एक टक्या पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते. पोलिओ, पक्षघातापासून मुक्तता मिळण्यासाठी पल्स पोलिओची लस घ्यायलाच हवी .

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT