मराठवाडा

शेतकऱ्याला सक्षम बनविणे हाच सरकारचा उद्देश  - रावसाहेब दानवे

सकाळवृत्तसेवा

औसा - ""आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात नाही; परंतु जोपर्यंत शेतकरी शेतीत शाश्‍वत गुंतवणूक करीत नाहीत आणि त्यांच्याकडे मुबलक पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत त्यांच्या समस्या सुटणार नाहीत. शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यापेक्षा त्याला कर्ज फेडण्याइतपत सक्षम बनवणे हा सरकारचा उद्देश असून, पुन्हा कर्जमाफीची पाळी शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहोत. तालुक्‍यात झालेल्या नुकसानाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन योग्य ती मदत केली जाईल,'' असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येल्लोरी (ता. औसा) येथे दिले. 

तालुक्‍यात अवकाळी पाऊस व गारपिटीने हजारो हेक्‍टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, ऊस, मका, भाजीपाला व द्राक्ष, डाळिंब या फळपिकांना फटका बसला आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी दानवे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तालुक्‍याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी येल्लोरी गावातील द्राक्ष बागायतदार गुंडप्पा निटुरे, गुरुराज कुलकर्णी यांच्या शेतातील द्राक्षाच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तसेच, वरवडा (ता. औसा) येथील गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. या वेळी दानवे यांनी या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली. ""पंतप्रधान कृषी विमा योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे, त्यांना तर विमा कंपनीकडून मदत केली जाईलच; शिवाय ज्यांनी विमा भरला नाही अशा शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील,'' असे त्यांनी सांगितले. 

शेतकरी राहिले बाजूला 
शेतकऱ्याला नुकसानात धीर द्यायला आलेल्या दानवे आणि पालकमंत्री निलंगेकरांच्या ताफ्यात कार्यकर्त्यांची इतकी भाऊगर्दी होती, की पालकमंत्री आणि दानवे यांच्यापर्यंत त्यांना पोचताही आले नाही. हा दौरा कार्यकर्त्यांचा होता की, शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी होता, असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना बाजूला सारून हे कार्यकर्ते "साहेब' आणि "भय्यां'च्या बाजूला उभे राहून फोटोत येण्यासाठी धडपडत होते, त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना मंत्र्यांना आपले दुःख काही सांगता आले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT