गुन्हा
गुन्हा  
मराठवाडा

जुगार अड्ड्यावर छापा, 24 जुगाऱ्यांना पकडले

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः शहरानजीक असलेल्या रोटेगाव परिसरातील शेतामध्ये सुरू असलेल्या एका पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 24 जुगाऱ्यांना सोमवारी (ता.17) पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख एक लाख 34 हजार रुपयांसह सात दुचाकी व 24 मोबाईल संच असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.


शहरानजीक असलेल्या रोटेगाव रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या एका शेतामध्ये पत्त्याचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक बी. जी. फुंदे, फौजदार बी. जी. दुलत, किरण गोरे, रमेश अफसनवाड व अन्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता तेथे 24 जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख एक लाख 34 हजार रुपयांसह जुगाराचे साहित्य, सात दुचाकी, 24 मोबाईल संच असा एकूण सहा लाख एक हजार 130 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून केवळ पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे अवैध धंदे बेफाम सुरू आहेत. साधारणतः दोन महिन्यांपूर्वी तालुक्‍यातील शिऊर येथे औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 13 जुगाऱ्यांना पकडले होते. त्यानंतर थोड्याच दिवसांत पुन्हा गुन्हे शाखेच्या पथकाने वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश करून स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पाडले आहे. या कारवाईमुळे शहर व परिसरात अवैध धंदे बिनबोभाटपणे सुरू आहेत, हेच यावरून सिद्ध होते. पोलिसांनी अवैध धंद्यासाठी जणू अलिखित परवानगीच दिली की काय, असेच चित्र पाहावयास मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT