औरंगाबाद - ऑरिकमध्ये अंतिम टप्प्यात असलेले उड्डाणपुलाचे काम. हा पूल कार्यरत झाल्यावर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत मार्गाला पर्यायी रस्ता होणार आहे.
औरंगाबाद - ऑरिकमध्ये अंतिम टप्प्यात असलेले उड्डाणपुलाचे काम. हा पूल कार्यरत झाल्यावर शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत मार्गाला पर्यायी रस्ता होणार आहे. 
मराठवाडा

गुजरातमध्ये तयार होणार पुलाचा हिस्सा

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीमध्ये (ऑरिक) ‘ब्रेक फ्री’ एंट्री घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला १५ डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली आहे. लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंनी या उड्डाणपुलाची उभारणी पूर्ण झाली असून, रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा हिस्सा हा गुजरातेत तयार होत आहे. 

ऑरिकमध्ये जाण्यासाठी औरंगाबाद-जालना महामार्गालगत तयार करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. या कामाचा आढावा नुकताच एआयटीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. एआयटीएलच्या रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलाचा भाग तयार करणार आहे. 

या पुलाच्या दोन्ही बाजू तयार झाल्या असून, यावर केवळ डांबरी थर टाकण्याचे काम शिल्लक आहे; मात्र या पुलाच्या मधोमध असलेला रेल्वेच्या अखत्यारीतील उड्डाणपुलाचा भाग हा अद्याप तयार झालेला नाही. यासाठी असलेले विशिष्ट डिझाईन दक्षिण-मध्य रेल्वेकडे मान्यतेसाठी गेले असून, यावरील मान्यतेची मोहोर उठण्यासाठी आठवडाभराचा अवधी लागण्याची चिन्हे आहेत.

कच्चा माल झाला प्राप्त
रेल्वेच्या हद्दीतील भागासाठी कच्चा माल हा मध्यप्रदेशातून गुजरातमध्ये प्राप्त झाला. तिथेच डिझाईननुसार गर्डरच्या साहाय्याने रेल्वे रुळावरील भागाची निर्मिती केली जाणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची अपेक्षा आता ऑरिक प्रशासनाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT