Rain
Rain 
मराठवाडा

औरंगाबाद शहरासह परिसरात धुवाधार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - जून महिन्यात ओढ देणाऱ्या पावसाने मात्र जुलै महिन्याच्या सुरवातीला काहीसा दिलासा दिला आहे. बुधवारी (ता. दहा) झालेल्या पावसाने शहर, परिसरात धुवाधार हजेरी दिली.

औरंगाबादसह मराठवाड्यात पाऊस अपेक्षेप्रमाणे पडलेला नाही. जून महिन्यात झालेल्या पावसाने सरासरी गाठली नव्हती. या महिन्यात सरासरी १६४ मिलिमीटर पावसाची अपेक्षा आहे. बुधवारी (ता. १०) ३३ मिलिमीटर पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली. 

शहराच्या विविध भागांत यामुळे पाणी साचले, तर रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ मंदावली होती. हा पाऊस परिसरातील शेतीला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

विजयनगर भागात वीस घरांत घुसले पाणी 
सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी गारखेडा परिसरातील विजयनगर, नंदिनी कॉलनीतील सुमारे वीस घरांमध्ये शिरले. रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी जमा झाल्यामुळे नगरसेविका ज्योती मोरे यांच्यासह नागरिकांनी सायंकाळी ५.३० वाजता अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. विजय राठोड, रमेश सोनवणे, अब्दुल हमीद, बापू घरत यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन काही जणांनी केलेले अतिक्रमण हटविले. त्यासाठी तब्बल अडीच तास लागले. 

वीस घरांत पाणी घुसल्याने किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, पाण्याचा निचरा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. तसेच उपमहापौर विजय औताडे यांच्या कार्यालयासमोर पाणी साचल्यामुळे अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. जय विश्‍वभारती कॉलनी भागात विजेच्या तारेवर झाड पडल्याची घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT