Rain
Rain 
मराठवाडा

नांदेड, परभणी, हिंगोलीत काही ठिकाणी पाऊस

सकाळवृत्तसेवा

नांदेड, औरंगाबाद - दीर्घ खंडानंतर नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत सोमवारी (ता.१७) काही तालुक्‍यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबरमध्येच ‘ऑक्‍टोबर हीट’ची अनुभूती येत असताना या पावसाने वातावरणात काहीसा बदल झाला.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथसह तालुक्‍यातील काही गावांत वीस ते पंचवीस दिवसांच्या विश्रांतीनंतर एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने सुकत असलेल्या सोयाबीनला जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. परभणी जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले असले तरी हा पाऊस सर्वच भागांत नसल्याने कही खुशी-कही गमचे चित्र होते. जिंतूर, मानवत तालुक्‍यात पाऊस समाधानकारक झाला आहे; मात्र वेळ चुकवून आल्याने सोयाबीनच्या उत्पादनात येणारी घट निश्‍चित असल्याचे सद्यःस्थितीतील पिकांच्या परिस्थितीवरून दिसत आहे.

वडवणीसह परिसरात सरी
बीड - वडवणी (जि. बीड) तालुक्‍यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. माजलगाव तालुक्‍यातील काही गावांत रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात मागील पंधरवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ असून आतापर्यंत केवळ ३२०.८० मिमी एवढाच पाऊस झाला आहे. एकूण वार्षिक सरासरीच्या ४८.१४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे.

औरंगाबादेत तुरळक
औरंगाबाद शहरातील काही भागात दुपारच्या सुमारास काहीकाळच तुरळक ते हलका स्वरूपाच पाऊस झाला. त्यानंतर काहीकाळ ढगाळ वातावरण होते. सायंकाळी तेही निवळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT