rain updates
rain updates rain updates
मराठवाडा

Rain Update: मराठवाड्यात कुठे हलका, कुठे मध्यम तर कुठे दमदार पाऊस

प्रमोद सरवळे

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. या तीन जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली

औरंगाबाद: प्रदीर्घ खंडानंतर मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने कुठे तुरळक, कुठे मध्यम तर कुठे दमदार हजेरी लावली. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. या तीन जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली. मंगळवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी अधूनमधून श्रावणधारा बरसतच होत्या. मराठवाड्यातील काही भागात जवळपास महिनाभरापासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ मंडळांपैकी औरंगाबाद तालुक्‍यातील हर्सूल मंडळाचा अपवाद वगळता ६१ मंडळांत पावसाची कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. आठ मंडळांत अतिवृष्टी तर ३५ मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. इतर मंडळांत तुरळक ते हलका पाऊस नोंदल्या गेला.

बीड जिल्ह्यातील ६३ मंडळांपैकी ६१ मंडळांत पावसाची हजेरी लागली. गेवराई तालुक्‍यात पावसाचा सर्वाधिक जोर होता. या तालुक्‍यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील २१ मंडळांत मध्यम ते दमदार तर ४० मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. केजमधील दोन मंडळांत पावसाचा टिपूसही बरसला नाही. जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४९ मंडळांत पावसाने हजेरी लागली. अंबड तालुक्‍यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या तालुक्‍यातील सातही मंडळांत सरासरी ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. इतर सर्व तालुक्यांत बरसणारा पाऊस अपवाद वगळता मध्यम ते दमदार स्वरूपात बरसला.

उस्मानाबाद, लातूरला मोठ्या पावसाची प्रतीक्षा
उस्मानाबाद, लातूरला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३७ मंडळातच पाऊस झाला. परंडा तालुक्‍यातील पाचही मंडळात पाऊस झाला नाही. पाऊस झालेल्या ३७ मंडळांपैकी सात मंडळात १०.१ ते २७.८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. उर्वरित मंडळांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली. लातूर जिल्ह्यातील सर्व ६० मंडळात कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. १५ मंडळांत १० ते २१.८ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. इतर मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला.

नांदेड, परभणी, हिंगोलीत भिज पाऊस
नांदेड जिल्‍ह्यात सर्वदूर भिजपाऊस झाला. परभणीत जिल्ह्यातही सर्वत्र रिमझिम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात २२ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता.१७) दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. मंगळवारी सकाळी आठपर्यंत १७. ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी अडीचपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. औंढा शहरात दुपारी जोरदार पाऊस झाला. तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणेः हिंगोली तालुका २२.४० मिलिमीटर, कळमनुरी २१.२० मिलिमीटर, वसमत १५.९० मिलिमीटर, औंढा नागनाथ १२.३० मिलिमीटर, सेनगाव १४.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७५ टक्के पाऊस झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT