kendrekar 
मराठवाडा

कोरोनाग्रस्तांचे मनोबल वाढवा, कोण म्हणाले ते वाचा...

गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गाची लागण होऊन रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांमध्ये या रोगाची दहशत पसरले असे वर्तन आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करू नये. उलट त्यांना मानसिक आधार देण्याचा कसोसीने प्रयत्न करावा अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता.दहा) दिल्या.

कोरोना विषाणु संसर्ग व उपाययोजना संदर्भात आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी (ता.१०) जूलै रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिकेचे आयुक्त श्री.पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी शहरातील महत्वाचे डॉक्टर, पत्रकारांची उपस्थिती होती.

खासगी डॉक्टरांनी तयारी ठेवावी 
श्री. केंद्रेकर म्हणाले, कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पहिले पाच दिवस अत्यंत महत्वाचे असतात. त्यामुळे या पाच दिवसात डॉक्टरांनी रुग्णांच्या मनोबल वाढविण्याबरोबरच इतर उपचार तातडीने करावेत यात कुठेही दुर्लक्ष करता कामा नये. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन त्यांच्या बाजूने पूर्णपणे सहकार्य करत असतांना आरोग्य यंत्रणेने देखील तितक्याच वेगाने व लक्षपू्र्वक काम करावे अश्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी दिल्या.कोरोनाच्या संसर्ग झालेल्या व्यक्तीसाठी पहिले पाच दिवस अंत्यत महत्वाचे असतात. त्यामुळे या पाच दिवसात त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आल्यास तो रुग्ण तातडीने कोरोनामुक्त होऊ शकतो. खासगी डॉक्टरांनी देखील त्यांच्या रुग्णालयातील खाटा कोरोना रुग्णासाठी आरक्षित कराव्या लागणार आहेत याची मानसिकता तयार करून ठेवावी. या रुग्णांची लुट होणार नाही याचीदेखील दक्षता घेतली गेली पाहिजे असेही त्यांनी सुचविले.

कोरोना कक्षाच्या बाहेर स्क्रिन लावा
कोरोना कक्षात भरती असलेल्या रुग्णांना मानसिक आधार द्यावा, नातेवाईक रुग्णांत संवाद रहावा यासाठी कोरोना कक्षाच्या बाहेर स्क्रिन लावून अधून मधून रुग्णांचे नातेवाईकांशी बोलणे करून द्यावे असे ही त्यांनी सांगितले. कंटेन्टमेट झोनमधील रहिवाशी जर इतरत्र फिरत असतील तर त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेशही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या वेळी दिले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना केल्या. 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

कोल्हापुरात मिरवणुकीत तणाव; दोन गट भिडले, लोकांची धावपळ

SCROLL FOR NEXT