Raosaheb Danve family  
मराठवाडा

Politics : दानवेंच्या कन्या हैद्राबाद दौऱ्यावर गेल्याने तर्कवितर्कांना उधाण; कार्यकर्तेही संभ्रमात

सकाळ डिजिटल टीम

कन्नड - माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव याही गेल्या दोन दिवसांपासून हैद्राबाद दौर्यावर आहेत. तालुक्यात संजना जाधव यांनी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्यातरी त्या अपक्ष म्हणून जोरदार तयारी करत आहेत.

त्या दोन दिवसांपासून तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या फोनवर रिंग जाते पण त्या फोन घेत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. सकाळ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधन्यात (ता.२) यश मिळवले. त्यांनी सांगितले की,गेली दोन दिवस त्या हैद्राबाद दौऱ्यावर आहेत.अजून काही दिवस त्या हैद्राबाद येथे थांबणार आहेत.

संजना जाधव या हैद्राबाद दौर्यावर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या संदर्भात संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधून खुलासा विचारला असता हा माझा कौटुंबिक दौरा आहे. याचा राजकीय गैर अर्थ काढू नये. माझ्यासोबत दादा म्हणजे माझे वडील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे आणि कुटुंबियही सोबत आहेत.याचा राजकीय अर्थ कोणीही काढू नये.

आपण जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या व्हॉट्स ॲप गृपवरून लेफ्ट झाला त्याचे कारण काय...यावर त्यांनी सांगितले की, माझ्या मोबाईलमध्ये व्हायरस घुसला आहे. माझे व्हॉट्स ॲपच हॅंग झाले आहे. त्यामुळे मी नितीन पाटील यांच्या व्हॉट्स ॲप गृपवरून लेफ्ट झाले आहे. तसेच इतरही व्हॉट्स ॲप गृपवरून लेफ्ट झाले आहे. मला फोनवर रिंग येते पण कोणाच्याही फोनला उत्तर देता येत नाही.

हैद्राबाद येथील व्हायरस तज्ञाकडे मोबाईल दुरुस्तीसाठी दिला आहे.व्हायरस काढला की फोन अपडेट होऊन मी पुर्ववत यापूर्वी होते त्या सर्व गृपला जोडल्या जाणार आहे. आपण हैद्राबादला नेमक्या कोणत्या कौटुंबिक कामास गेला आहात असे विचारले असता त्यांनी केवळ हसून या प्रश्नास उत्तर देण्यास टाळले.व त्यांना तेथील कार्यक्रमातील कौटुंबिक छायाचित्र मागितले असता ते त्यांनी पाठवले आहे.

संजना जाधव यांच्या हैद्राबाद दौर्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात अधिकच भर पडून वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT