ravsaheb danve attend marriage of their constituency kalyan kale lok sabha politics
ravsaheb danve attend marriage of their constituency kalyan kale lok sabha politics Sakal
मराठवाडा

Phulambri News : लग्नसराईत दानवे - काळेंची जुगलबंदी; उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात

नवनाथ इधाटे

Phulambri News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. एरवी दानवेंची टोलेबाजी, किस्से आणि भाषणांना बहर येतोच, पण लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली असताना त्यात अधिकच भर पडते. भाजपने दानवे यांना सहाव्यांदा जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवातही केली. लोकांमध्ये रमणारे नेते म्हणून ओळख असलेले दानवे मतदारसंघातील शुभकार्यात आवर्जून हजेरी लावतात. आता तर निवडणुका आहेत, मग एकही लग्न सुटता कामा नये याकडे यासाठी ते धावपळ करताना दिसतात.

अशाच एका छत्रपती संभाजी नगर ते जळगाव महामार्गावर असलेल्या चौका येथील विवाह समारंभात त्यांचा सामना काँग्रेसचे माजी आमदार व जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्याशी झाला.

त्याचे झाले असे की हे दोघेही विवाह समारंभात सहभागी होऊन वधू-वरास शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सोबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गराडाही होता. काळे आले तेव्हा रावसाहेब दानवे स्टेजवर होते. वधू-वराला शुभेच्छा देत असताना तिथे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काळे यांनी खालीच थांबून वाट पाहणे पसंत केले.

काही मिनिटांनंतर रावसाहेब दानवे स्टेजवरून खाली उतरले आणि जाऊ लागले. स्टेजवरूनच दानवे यांच्या चाणाक्ष नजरेने काळे यांची लगबग टिपली होती. त्यामुळे जाताना काळेंना चिमटा काढण्याची संधी त्यांनी हेरलीच. काळेसाहेब जा... तुमच्यासाठी स्टेजवरची जागा रिकामी करून दिली', असा टोला त्यांनी लगावला.

त्यावर काळे तरी गप्प कसे बसतील? मग त्यांनीही आपल्यातील हजरजबाबीपणाचे दर्शन घडवत 'दानवेसाहेब तुम्ही जागा खाली केल्याशिवाय आमचा नंबर कसा लागेल?' असा चिमटा काढला. त्यानंतर मात्र रावसाहेब दानवे स्मितहास्य करत तिथून निघून गेले.

काळें चक्क दानवेंनाच चकवा देण्याच्या तयारीत

जालना लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंची दमछाक केली होती. अवघ्या साडेआठ हजार मतांनी काळे तेव्हा मागे राहिले आणि दानवेंचा जीव भांड्यात पडला होता. आता 2024 मध्ये काँग्रेस पुन्हा काळेंना मैदानात उतरवून दानवेंनाच चकवा देण्याच्या तयारीत आहे.

कोण कोणाला भारी ठरतो.?

महाविकास आघाडीकडून डॉ.कल्याण काळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पक्षाकडून त्यांना संकेत मिळाल्यामुळे ते कामाला लागले आहेत. फुलंब्रीत हे दोन्ही नेते निवडणुकीआधीच समोरासमोर आले आणि त्यांच्यात जुगलबंदी रंगली. प्रत्यक्ष निवडणुकीत कोण कोणाला भारी ठरतो? हे मतदार ठरवतीलच, पण काळे-दानवे यांच्या जुगलबंदीने त्यांच्या समर्थकांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ''आता लग्न करावंच लागेल'' रायबरेलीत प्रचार करताना राहुल गांधी असं का बोलले?

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; देशात 52.60 टक्के तर राज्यात 42.35 टक्के मतदान

Zara Hatke Zara Bachke: 11 महिन्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार 'जरा हटके जरा बचके'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Naxal Attack: गडचिरोलीत मोठी कारवाई! भामरागड तालुक्यात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

Lok Sabha Election : मुंढव्यामध्ये मतदार यादीतून 700 ते 800 लोकांची नावे गायब; लोकांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT