Recruitment of Police on the basis of Government rule 
मराठवाडा

'2011 शासनादेशानुसारच पोलीस भरती करा'

सकाळवृत्तसेवा

बीड  : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस शिपाई भरतीचा 2011 चा नियम बदलून ता. 18 जानेवारीच्या नव्या आदेशात मैदानी चाचणी शंभर गुुणांऐवजी 50 गुणांची केली आहे. त्यामुळे मैदानी चाचणीचा दिवस रात्र सराव करणाऱ्या उमेदवारांचे मोठे नुकसान होणार आहे. नवा शासनादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 31) भरतीच्छुक तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला.

पोलिस शिपाई भरतीच्छुक तरुण सर्वाधिक मैदानी चाचणीचा सराव करत असतात. 2011 च्या शासनादेशात शंभर गुणांची मैदानी चाचणी असे. मात्र, गृहविभागाने नुकत्याच काढलेल्या शासनादेशात मैदानी चाचणी केवळ 50 गुणांची केली आहे. त्यामुळे पोलिस शिपाई भरतीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. नवीन शासनादेश मागे घेऊन आगामी पोलिस शिपाई भरती जुन्याच शासनादेशा प्रमाणे घ्यावी, या मागणीसाठी गुरुवारी भरतीच्छुक तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे फलक हाती घेत युवक मोर्चात सहभागी झाले. यामध्ये तरुणींचाही मोठा सहभाग होता.

कृष्णा पाठक, राजेंद्र आमटे, अमोल धन्वे, सुरज साळवे, रवी शिंदे, एच. बी. काकडे, हनुमान घोडके, अर्जुन सपकाळ, अशोक चौरे, आर्यन झणझणे, बबलू ठोकळ, विलास घोलप, अमोल नरनाळे, विकास गव्हाणे, भूषण गालफाडे, बंटी भिसे, नवनाथ कुर्लेकर, गणेश पवळ, अक्षय घल्लाळ, गणेश वायभट, रवींद्र रकटे, विकास वाघमारे, अशोक भोंडवे, अमोल लांडगे, कृष्णा चौधरी आदींसह तरुण सहभागी होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'या' लाडक्या बहिणींवर होणार कारवाई, मंत्री आदिती तटकरेंचा थेट इशारा..

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात जसा तपास पुढे जाईल तसे धक्कादायक पुरावे समोर; विद्यार्थ्यांच्या वहीत सापडले हाताने लिहिलेले प्रश्न

IND VS AFG 2026 Squad: रिषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम! उप कर्णधारपदावरून उचलबांगडी; ३ वर्षानंतर 'या' खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी

'MS Dhoni खेळतोय की नाही, मला फरक पडत नाही, त्याच्या नादात CSK ने...', संजय मांजरेकरांचं रोखठोक मत

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT