Deoni Vegetable Prices sakal
मराठवाडा

Deoni Vegetable Prices : ऐन सणासुदीत भाजीपाल्याचे वाढले भाव, शहरासह ग्रामीण भागामधील बाजारातील स्थिती, ग्राहक त्रस्त

Deoni Vegetable Prices : सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे ग्राहकांची अवस्था बिकट झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

देवणी : सततचा पाऊस अन् जमिनीतील अतिरिक्त ओलाव्यामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी बाजारात भाजीपाला दरात मोठी वाढ झाली आहे. लसणाचे किलोप्रमाणे दर चक्क चारशे रुपये झाले आहेत, तर दोडके शंभर रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांना महागडा भाजीपाला विकत घेण्याची वेळ आली आहे.

दैनंदिन आहारात पालेभाज्यांना मोठे महत्त्व. आहारात डाळीसोबत ताज्या पालेभाज्यांचा वापर नित्याचाच. तालुक्यासह ग्रामीण भागात हंगामी पिकासोबत कुटुंबाला पुरेसा होईल इतका भाजीपाला परसबाग पद्धतीने लागवड केला जातो.

त्यात बहुतांश भाज्याची लागवड शेतकरी करून त्याचा वापर कुटुंबाला नियमित होतो. मात्र यावर्षी लांबत चाललेला पावसाळा, जमिनीत सतत अतिरिक्त ओलावा, पावसाळी अन् ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. दैनंदिन मागणी असली तरी पुरवठा कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर गगनाला पोचले आहेत. शिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असून मागणी अधिकची राहत असल्याने किमतीत सतत वाढच होत असल्याचे चित्र आहे.

दोडक्याने गाठली शंभरी

सध्या बाजारासह सर्वच ठिकाणी चवळी, मटकी, फुलकोबी, पत्ताकोबी या भाज्यांचे दर ८० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तर दोडका शंभर रुपये किलो झाला आहे. कोथिंबीर दहा रुपये प्रति पन्नास ग्रॅम, मिरची ४० रुपये किलो, कांदा तसेच टोमॅटो प्रत्येकी सत्तर रुपये, बटाटा ४० रुपये किलो, फुलकोबी, कोबी, कारले ८० रुपये प्रतिकिलोने तर भोपळा वीस रुपये प्रति नग याप्रमाणे विक्री होत आहे.

कांदा लसूण अद्रकाच्या दरात वाढ

फोडणीत कांदा लसूण अद्रक या तीन घटकांचा मोठा वाटा. भाजीला चव आणण्यासाठी हे तिन्ही घटक निर्णायक. मात्र सध्या या तिन्हीच्या दराने मोठी वाढ झाल्याने गृहिणींना फोडणी महागली आहे. कांद्याने ७० रुपयाचा पल्ला गाठला आहे. तर लसूण ४०० रुपये प्रति किलो तर अद्रक २०० रुपयाने विक्री होत आहे.

रोगग्रस्त वातावरणाने भाजीपाला उत्पादक त्रस्त

सततच्या दमट वातावरणाने दोडका, कार्ले, भोपळा या वेलवर्गीय भाजीपाल्यावर भुरी, डाऊनी, करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर भेंडी, मटकी, चवळी, कोबी आदी भाजीपाल्याला अळीसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगामुळे मोठा खर्च करूनही भाजीपाला उत्पादक शेतकरी नुकसानीतच असल्याची स्थिती आहे. दरात मोठी वाढ झाली आहे, मात्र उत्पादनच निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT