PALIKA DAND
PALIKA DAND 
मराठवाडा

रस्त्यावर अडथळा आणणे पडणार महागात

सकाळ वृत्तसेवा


नांदेड ः सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणे, बांधकाम तसेच इतर साहित्य ठेवणे, विनापरवानगी रस्ता खोदणे असे प्रकार आता नांदेडमध्ये महागात पडणार आहेत. याबाबत नांदेड महापालिकेने कठोर पावले उचलली असून अशा पद्धतीची कृती करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असून दंडही वसूल करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसात चार जणांवर कारवाई करुन महापालिकेने ४० हजाराचा दंडही वसूल केला आहे. महापालिकेच्या सहाही क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत दक्ष राहून पाहणी करण्याच्या सूचना केल्या असून त्यासाठी एक फिरते पथकही नियुक्त केले आहे.

शहरातील काही भागात रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर महाभागांनी पूर्ण रस्त्यावरच बांधकामांचे साहित्य टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने त्याची दखल घेत कारवाईस सुरुवात केली आहे. अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत न्यू शाहूनगर भागातील रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकून रस्ता अडविल्याबद्दल मालमत्ताधारक कैलास सुपारे यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर सदरील मालमत्ताधारक विनापरवानगी ड्रेनेज कनेक्शन घेण्यासाठी सिमेंटचा रस्ता फोडत असल्यामुळे त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आणि ब्रेकर मशीनही जप्त करण्यात आली.


शहरातील दुसरे एक मालमत्ताधारक एन. जी. उके यांनी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली त्यामुळे त्यांच्याकडून पाच हजार दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आनंदनगर येथील श्री. जाधव यांच्याकडूनही वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अनाधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी ही कार्यवाही केली. या वेळी त्यांच्यासमवेत क्षेत्रीय अधिकारी गौतम कवडे, उपअभियंता इमारत निरीक्षक नंदकुमार बोधनकर, स्वच्छता निरीक्षक गणेश मुदीराज, नईम शेख, गणेशसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

रस्त्यावर बांधकामाचे किंवा इतर साहित्य टाकून रस्ता अडविण्याचे प्रकाराबाबत तक्रारी महापालिकेकडे येत आहे. त्यामुळे आयुक्त लहुराज माळी यांच्या सूचनेनुसार क्षेत्रीय कार्यालयातंर्गत गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील रस्त्यामध्ये अडथळा आणणाऱ्यांची माहिती किंवा तक्रार द्यावी. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करता येईल.
- अजितपालसिंघ संधू, उपायुक्त, महापालिका.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT