file photo 
मराठवाडा

88 हजारांचा ऐवज चोरणारे दोघे दुसऱ्या गुन्ह्यातून ताब्यात

सुषेन जाधव

औरंगाबाद : श्रीकृष्णनगर परिसरातील (शहानुरवाडी) घरातून रोख रक्कम व दागिने असा 88 हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणात दोघा आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यातून ताब्यात घेऊन मंगळवारी (ता.24) न्यायालयात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे यांनी दिले. 

प्रवीण जैस्वाल (37, रा. श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने असा 88 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. दरम्यान प्रवीण यांच्याकडे शिकवणीला आलेल्या लहान मुलीच्या सजगतेमुळे चोरी उघडकीस आली होती. तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी सैय्यद शहारुख सैय्यद रशिद (रा. शम्सनगर, शहानूरनाडी) व शेख अली शेख सत्तार (पठाण) (रा. काबरानगर) यांना दुसऱ्या गुन्ह्यातून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपींनी चोरीच्या ऐवजापैकी केवळ दोन हजार रुपये काढून दिले असून, त्यांच्याकडून उर्वरित ऐवज जप्त करणे बाकी आहे. आरोपींनी आणखी कुठे गुन्हे केले आहेत का आदी बाबींचाही तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. एल. दास-जोशी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने दोघा आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT