Latur News
Latur News 
मराठवाडा

ग्रामीण भागातील डाॅक्टरांनी कोरोनाला घाबरून काढला पळ

प्रशांत शेटे

चाकूर : महानगरातील डाॅक्टरांची टीम कोरोनाशी एकाकी झुंज देत असताना ग्रामीण भागातील डाॅक्टरांनी आपली दवाखाने बंद करून पळ काढला आहे, त्याच्या या कृतीमुळे संताप व्यक्त केला जात असून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे येथील डाॅक्टरांवर जास्तीचा ताण येत आहे. 

देशात कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून महानगरातील डाॅक्टरांची टिम रात्र दिवस काम करीत आहे. शासनाने लाॅकडाऊनचा आदेश काढल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक डाॅक्टरांनी आपली खासगी दवाखाने बंद केली आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व खासगी दवाखाने सुरु ठेवावीत अशा सूचना केल्या आहेत. परंतु डाॅक्टरांकडून त्याचे पालन केले जात नाही. 

तालुक्यातील जानवळ, चापोली, चाकूर, नळेगाव, चाकूर या ठिकाणी खासगी डाॅक्टरांची दवाखाने आहेत यापैकी अनेकांनी दवाखाने बंद केली आहेत त्याच बरोबर मोबाईल ही बंद केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची ठरावीक डाॅक्टरवर श्रध्दा असते यामुळे हे रुग्ण तपासणीसाठी आले असता दवाखाना बंद असल्यामुळे त्यांना अडचण होत आहे. 

सर्व खासगी डाॅक्टरांनी आपली दवाखाने सुरु ठेवावीत व रूग्णांची तपासणी करावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत यावरही जे डाॅक्टर दवाखाने बंद ठेवत आहेत त्यांच्यावर काऱवाई केली जाईल.
- डाॅ. शिवानंद बिडवे, तहसीलदार चाकूर 

आपल्या दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढावी यासाठी अनेक डाॅक्टर आठवड्यातून एक दिवस खेड्यापाड्यात जात होते तेही सध्या येत नाहीत. यामुळे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींची तपासणी करतानाच इतर रुग्णांची तपासणी करावी लागत असल्यामुळे येथील डाॅक्टरांवर जास्तीचा ताण पडत आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सॅनिटायझर, मास्क उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला रुग्णाची तपासणी करणे अडचणीचे होत असल्याचे कारण खासगी डाॅक्टरांकडून सांगितले जात आहे. केंद्र शासनाने कोरोनाशी लढणाऱ्या डाॅक्टरांसाठी ५० लाख रूपयाचे विमा संरक्षण जाहीर केले आहे त्याप्रमाणे विमा संरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी खासगी डाॅक्टरांकडून होत आहे.

सर्वच आजार कोरोना नाहीत तरीही काही खासगी डाॅक्टरांनी आपली दवाखाने बंद ठेवली आहेत त्यामुळे इतर आजार असलेल्यांनी कुढे जायचे, कोरोना बाबत घ्यावयाची काळजी डाॅक्टरांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी दवाखाने बंद ठेवणे चुकीचे आहे. अशा कढीण प्रसंगी पळून जाणाऱ्या डाॅक्टरावर पुढील काळात सर्वांनी बहिष्कार टाकण्याची गरज आहे. 
- राजकुमार मुगावे, चाकूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT