ncp
ncp 
मराठवाडा

महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादीचे ‘महिला सेफ्टी ऑडीट’

सकाळवृत्तसेवा

बीड : भारत हा महिलांसाठी सुरक्षित देश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘महिला सेफ्टी ऑडीट’ हा उपक्रम सुरु केला आहे. मराठवाड्यातील या उपक्रमाची सुरुवात बुधवारी (ता. ११) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते बीडमधून झाली. 

महिला सुरक्षेबाबत ३५ कायदे असले तरी पोलिसांकडून कडक अंमलबजावणी होत नसल्याने महिलांवरील अन्याय - अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. या उपक्रमातून महाराष्ट्र हिंसाचार मुक्त होण्यास मदत होईल. गाव आणि शहरांतील काही भागांत ठराविक ठिकाणी महिला, युवती आणि शालेय विद्यार्थीनींची छेडछाड होत असते. या उपक्रमात अशी ठिकाणे शोधून त्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक, या ठिकाणी पथदिवे बसवून छेडछाड रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हा उपक्रमातून कुठलेही राजकारण नसून समाधानासाठी असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला. राज्यात प्रत्येक दिवशी १२ महिला/मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत.

नुसत्याच बेटी बचाव बेटी पढावच्या गप्पा मारल्या जात असून उत्तर प्रदेशातील घटना पाहता सत्ताधाऱ्यांपासून बेटी बचाव म्हणण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. बीडमधील एका आमदारावर बलात्काराचा आरोप होऊनही पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही. त्याबाबत उच्च न्यायालयात खटला दाखल केल्याचे त्यांनी सांगीतले. रामराज्य म्हटले जात असले तरी रावणराज्यापेक्षा बत्तर अवस्था झाल्याचा आरोप करुन गृहखाते सांभाळणाऱ्याची मानसिकता महत्वाची असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT