Sakal Samvad sakal
मराठवाडा

Sakal Samvad : मराठवाड्यासाठी रेल्वेगाड्या वाढवा ; रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सूर,दुहेरी मार्ग लवकर व्हावा पूर्ण

ज्या शहराच्या ठिकाणी दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात असतात, त्या शहराचा विकास झपाट्याने होत असतो. मात्र, आजही मराठवाड्यातून मुंबई, पुणे, नाशिकला जाण्यासाठी केवळ दोन ते तीनच गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना इतर पर्यायाचा वापर करावा लागतो.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ज्या शहराच्या ठिकाणी दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात असतात, त्या शहराचा विकास झपाट्याने होत असतो. मात्र, आजही मराठवाड्यातून मुंबई, पुणे, नाशिकला जाण्यासाठी केवळ दोन ते तीनच गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना इतर पर्यायाचा वापर करावा लागतो. यात दक्षिण मध्य विभागाने मराठवाड्यावर दुजाभाव न करता मराठवाड्यातून मुंबई, जोधपूर, गोवा, सुरत, नाशिक अशा इतर ठिकाणी जाण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गाड्या वाढवाव्यात व रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, असा सूर रेल्वे संघटनांतील विविध पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमांमध्ये काढला.

बुधवारी (ता.७) ‘सकाळ संवाद’ कार्यक्रम झाला. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष आनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर, नमो रेल्वे यात्री ऑर्गनायझेशनचे गौतम नाहटा, राजेश चव्हाण यांनी मराठवाडा तसेच महाराष्ट्राच्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी बोरकर म्हणाले, ‘‘नुकताच केंद्र शासनाच्या वतीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील १५ हजार ५४ कोटींतील २ हजार ७०० कोटी हे मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासासाठी मिळाले असल्याचे सांगितले. या निधीतून मराठवाड्यातील रेल्वेसंदर्भात विकासकामे होणार आहेत.’’

पारटकर म्हणाले, ‘‘मराठवाड्याचा विचार केला तर रोटेगाव-कोपरगाव हा मार्ग तयार करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. मात्र, हा महत्त्वाचा मार्ग असून, यासाठी शिर्डी संस्थान व इतर प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच चाळीसगावच्या मार्गासाठी प्रयत्न करावे. तसेच दुहेरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू असून, ते लवकरात-लवकर पूर्ण व्हावे.’’ चव्हाण म्हणाले, ‘‘मराठवाड्यातील पंचतारीख औद्योगिक क्षेत्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग वसाहती आहेत. यातील लासूर, नगरसूल, रोटेगाव, दौलताबाद या ठिकाणांवरून मोठा कामगार वर्ग हा कंपन्यांसाठी येतो. त्यासाठी नगरनाका येथे छोटासा थांबा करावा.’’ तर, नाहटा यांनी छत्रपती संभाजीनगर- मुंबई- जोधपूर- गोवा- सुरत येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्या वाढविण्याची मागणी केली.

मराठवाड्याला २ हजार ७०० कोटी

अहमदनगर- बीड-वैजनाथ रेल्वे मार्गाला (२५० किमी) २७५ कोटी, नांदेड-वर्धा (२७० किमी) ७५० कोटी, सोलापूर-धाराशिव-तुळजापूर या नवीन मार्गासाठी (८४.५ किमी) २२५ कोटी मिळाले आहेत. तर, दुहेरी मार्गासाठी मनमाड- अंकाई- संभाजीनगर ९४ किलोमीटरसाठी जवळपास २१४ कोटी मिळाले आहेत. तसेच मराठवाड्यात पाच ठिकाणी बायपासची सुविधा करण्यात येणार आहे. यात अंकाई बायपाससाठी २० कोटी, पूर्णा १० कोटी, लातूर- ४० कोटी, मुखेड-२० कोटी तर परळी बायपाससाठी ४० कोटी असा निधी जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती आनंत बोरकर यांनी दिली.

प्रमुख मागण्या

  • फुलतांबा येथील रेल्वे मार्ग करावा.

  • दक्षिण मध्ये रेल्वे येथील नांदेड विभागातील ८९३ किलोमीटरपैकी केवळ ८१ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण.

  • दक्षिण मध्ये रेल्वेमधील नांदेड विभाग हा मध्य विभागाला जोडावा.

  • वंदे भारत रेल्वे ही मुंबईला एकच तास थांबून परत निघते, याचा प्रवाशांना फायदा होत नाही. यामुळे चार तासांनंतर ही गाडी परत निघावी.

  • डेमो ही गाडी नगरसूल येथे आठ तास थांबते, या आठ तासांच्या वेळात ही गाडी नाशिक व मनमाडपर्यंत सोडावी.

  • सर्व गाड्या छोट्या स्थानकावर थांबाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT