police esakal
मराठवाडा

Police: अँटी करप्शन ट्रॅप अन् घाबरलेला पोलिस थेट ऊसाच्या शेतात; सिनेमाला लाजविणारी घटना

सकाळ डिजिटल टीम

श्रीगोंदे: बेलवंडी पोलिस ठाण्यातील ‘कलेक्टर’ असणाऱ्या पोलिसावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज लक्ष केंद्रित केले होते. त्या पोलिसाविरुद्ध एक तक्रार होती.

ठरल्याप्रमाणे रक्कम घेऊन फिर्यादी ठाण्यात गेला, पण तेथे ‘साहेबां’चे ऑडिट सुरू असल्याने, सदर पोलिसाने आलेल्या त्या व्यक्तीला ‘कपाटात ठेव’ असा संदेश दिला आणि त्याचवेळी एसबीचे पथक ठाण्यात पोचले.

पथकाला पाहताच, कुठलाही विचार न करता संशयित त्या पोलिसाने धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत उसाच्या शेतात शोध सुरू असला, तरी तो पोलिस काही सापडला नव्हता.

सिनेमाला लाजविणारी घटना बेलवंडी पोलिसांत घडली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले गेले.

समजलेल्या माहितीनुसार, बेलवंडी पोलिस ठाण्यात ‘साहेबां’च्या जवळ असणाऱ्या एका पोलिसाविरुद्ध एसीबीकडे लाच मागितल्याची तक्रार दाखल झाली. आज लाच देण्याचा दिवस असल्याने एसीबीचे पथक बेलवंडीत होते. एसीबीच्या इशाऱ्यावर तो फिर्यादी बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला.

चार हजारांची लाच असल्याची माहिती आहे. ती रक्कम पोलिसांकडे घेऊन गेला, मात्र ठाण्यात वरिष्ठांचे ऑडिट असल्याने त्या पोलिसाने, आणलेली रक्कम कपाटात ठेवा, असे सांगितले. फिर्यादीने रक्कम कपाटात ठेवली आणि पथक त्या पोलिसाच्या समोर उभे ठाकले.

पण तो पोलिसही चतुर निघाला. आपण सापडलो, हे लक्षात येताच पथकाच्या साक्षीने त्याने ठाण्यातून धूम ठोकली. एरवी एखादा आरोपी ठाण्यातून पळून जाताना पाहिले आहे, मात्र आज पोलिसच पळाला.

तो पळून जाईल असे न वाटल्याने पथक काहीसे बिनधास्त होते आणि त्याचाच फायदा घेऊन आरोपी ठरणारा पोलिस पळून गेला.

ठाण्याच्या जवळच उसाचे क्षेत्र आहे. तेथे तो लपल्याची चर्चा होती, मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नव्हता. या घटनेची नोंद करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT