shivsena 
मराठवाडा

संदीप क्षीरसागरांना धक्का; समर्थक बाळासाहेब गुंजाळांचा शिवसेनेत प्रवेश

पांडुरंग उगले

बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक, नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवारी (ता.२८) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनाप्रमुख कुंडलिक खांडे आदींच्या उपस्थित श्री. गुंजाळ यांनी हातात शिवबंधन बांधले.

पेठ बीड भागातील सिंहासनाधिश ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन निर्माण करणाऱ्या बाळासाहेब गुंजाळ यांनी नगरसेवकपद भूषविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे ते कट्टर समर्थक होते.

श्री. गुंजाळ यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रवेशाने पेठ बीड भागात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण होणार आहे, असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT