parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani News : राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे टेनिस व्हॉलीबॉल खेळाच्या आरक्षणासाठी साकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारतीय टेनिस व्हॉलीबॉल या खेळांची निर्मिती लातूर (महाराष्ट्र) येथील डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी केली आहे. आजपर्यंत टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या २५ राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : भारतीय टेनिस व्हॉलीबॉल या खेळास पाच टक्के आरक्षण व शासकीय सुविधा द्याव्यात, असे साकडे क्रीडामंत्री संजय बनसोडे राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघटनेने घातले. पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे हे सोमवारी शहरात आले असता राज्य संघटनेचे सचिव गणेश माळवे, उदगीर येथील उद्योजक अशोक बाहेती यांनी त्यांना निवेदन दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारतीय टेनिस व्हॉलीबॉल या खेळांची निर्मिती लातूर (महाराष्ट्र) येथील डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी केली आहे. आजपर्यंत टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या २५ राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शालेय स्तरावर टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. केंद्रीय मान्यता पत्र देखील प्राप्त झाले आहे. तरी शासनाने भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळाच्या राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन व ५% आरक्षण व शासकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्यास खेळाडूंना फायदा होईल.

ह्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य संघटनांचे मुख्य कार्यालय महाराष्ट्रात पुणे येथे आहे. आपल्या भारतीय खेळाडूंना या खेळाचा फायदा व्हावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, महाराष्ट्र राज्याचा झेंडा शासनाच्या मार्गदर्शनातून संपूर्ण जगात पोहचण्यासाठी मदत होईल, असे हे या निवेदनात म्हटले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT