Sant Gajanan Maharaj Palkhi sakal
मराठवाडा

Sant Gajanan Maharaj Palkhi : श्री संत गजानन महाराजांची पालखी जालन्यात दाखल; दोन दिवस शहरात मुक्काम

श्री संत गजानन महाराजांची पालखी गुरुवारी (ता. १) शहरात दाखल झाली आहे. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. पालखी दोन दिवस शहरात मुक्कामी असून गुरुवारी पालखी शहरातील श्री सरस्वती भुवन प्रशाला येथे मुक्कामी होती.

सकाळ वृत्तसेवा

जालना : श्री संत गजानन महाराजांची पालखी गुरुवारी (ता. १) शहरात दाखल झाली आहे. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. पालखी दोन दिवस शहरात मुक्कामी असून गुरुवारी पालखी शहरातील श्री सरस्वती भुवन प्रशाला येथे मुक्कामी होती.

शहराच्या हद्दीवर महापालिकेच्या वतीने पालखीचे आयुक्त संतोष खांडेकर, कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर, संजय भालेराव आदींनी स्वागत केले. त्यानंतर पालखी अंबड रोडवरील पाण्याची टाकी, अंबड चौफुली, नूतन वसाहत, शनिमंदिर मार्गे सरस्वती भुवन प्रशाला येथे दाखल झाले.

दरम्यान शहरात पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळी तसेच फुलांचा वर्षाव केला. शिवाय ठिकठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या पालखीमध्ये सुमारे सातशे वारकरी सहभागी असून पाणी, चहा, नाष्टा, फळे वाटपाचे स्टॉल नागरिकांनी वारकऱ्यांसाठी उभारले होते.

नूतन वसाहत येथे श्री गजानन महाराज यांची पालखी दाखल झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी पालखीचे स्वागत केले. शिवाय वारकऱ्यांना गुलाबाचे पुष्प देऊन त्यांचे जालना शहरात स्वागत केले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पालखी श्री सरस्वती भुवन प्रशाला येथून गांधी चमन, मस्तगड, मंमादेवी, सुभाष चौक, महावीर चौक, मामा चौक, वीर सावरकर चौक, टांगा स्टँड जवळून मिशन हॉस्पिटलमार्गे जेईएस. कॉलेज येथे मुक्कामी राहणार आहे.

आज मोफत मधुमेह तपासणी शिबिर

रोटरी क्लब ऑफ जालना इलाईटच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी चार ते सात या वेळेत जेईएस महाविद्यालयात श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखीतील भाविकांसाठी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, सचिव अनया अग्रवाल, रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट डायबिटीज डायरेक्टर डॉ. राजेश सेठिया यांच्यासह रोटरी पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT