Sarpanch kidnapped at Dharmabad taluka
Sarpanch kidnapped at Dharmabad taluka 
मराठवाडा

सरपंचाचे अपहरण करून डांबले; धर्माबाद तालुक्यातील घटना 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सरपंचपदाचा राजिनामा किंवा निवडणूकीत आलेला खर्च देत नसलेल्या चक्क सरपंचाचे अपहरण करून डांबुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पाटोदा (खु) येथे शनिवारी (ता. १४) घडला. 

पोलिस सुत्रांच्या माहितीवरुन धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (खु) येथे अडीच वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत पॅनलप्रमुख उत्तमराव जाधव यांनी आपले पॅनल निवडूण आणले. त्यानंतर अडीच वर्षासाठी सरपंच म्हणून संजय पांडूरंग ईमनेलु (वय ३७) यांची निवड केली. ईनमेलु यांचा कार्यकाळ संपल्याने पॅनलप्रमुख यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. परंतु सरपंचपदाचा राजिनामा देण्यास ईनमेलु यांनी नकार दिला. यावरून पॅनलप्रमुखांनी निवडणूकीत लावलेले दोन लाख रुपये मला दे असे म्हणून तगादा लावला. परंतु सरपंच हे टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच उत्तमराव जाधव यांनी त्यांचे अपहरण करून रामतिर्थ येथे एक दिवस डांबुन ठेवले. हा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने आपली बदनामी झाली म्हणून सरपंच संजय ईनमेलु यांनी धर्माबाद ठाणे गाठून आपली तक्रार दिली. यावरून अपहरणाचा उत्तमराव जाधवविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार अनिल सनगले हे करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT