police
police 
मराठवाडा

पोलिस अधिक्षक कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी ' या उक्तीला पुढे करत नव्यानेच पोलिस दलात रूजु झालेल्या महिला सिमा साखरवाड यांनी पुढे येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे त्यांना पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी एक हजाराचे बक्षिस जाहीर केले. 

पोलिस अधिक्षक कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त त्यांना पोलसि अिक्षक श्री. जाधव यांनी अभिवादन केले. त्यांनी सावित्रीबाई यांच्याबद्दल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या खात्यातील सावित्रीच्या लेकींनी पुढे येऊन त्यांच्या कार्याचा वारसा चालविला पाहिजे. यावेळी अमरावती येथून नांदेड पोलिस दलात दाखल झालेली महिला कर्मचारी सिमा साखरवाड (बन.३८८) यांनी एखांद्या तरबेड व्याख्यात्यासारखे आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, स्त्री जीवनाच्या खऱ्या भाग्य विधात्या सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले आहेत. त्यांच्यामुळेच आज मी तुमच्यापुढे उभी आहे. एक स्त्री शिकली तर घर शिकल्यासारखे असते. म्हणूनच म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उध्दारी.

शेवटी त्यांनी जिल्हा पोलिस दलाचे कुटूंब प्रमुख जाधव यांचे आभार मानले. यावेळी प्रभारी पोलिस उपाधिक्षक (गृह) प्रशांत देशपांडे, पोलिस निरीक्षक (मुख्यालय) शहादेव पोफळे, नियंत्रण कक्षाचे शेख चांद, पोलिस कल्यानचे राजेंद्र मुंडे, प्रशिक्षणचे अरूण नागरे, आरएसआय राठोड, जनसंपर्क विभागाचे एएसआय उत्तम वाघमारे, हवालदार सुर्यभान कागणे, साहेबराव सगरोळीकर यांच्यासह अधिक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT