मराठवाडा

विक्रेत्यांची ‘सुट’ तरीही ग्राहक फिरकेनात

राजेश दारव्हेकर

हिंगोलीः आधीच दिवाळीच्या दरम्यान पडलेला पाऊस अन् त्यातून वातावरणात झालेला बदल यामुळे दिवाळीत पडणारी थंडी गायब झाली आहे. याचा परिणाम स्वेटर विक्रेत्यासह बाजारपेठेतील विविध साहित्य विक्रीवर झाला आहे. हिंगाेलीच्या बाजारपेठेत राज्यासह परराज्यातून आणि नेपाळ येथून आलेल्या विक्रेत्यांनी अनाेखी शक्कल लढवित उबदार कपड्यांच्या खरेदीवर ग्राहकांना एका नगासाठी तब्बल दहा ते पंढरा टक्के सुट देऊ केली आहे. मात्र, अद्यापही ग्राहकांना ही ‘सुट’ लागु पडल्याचे पहावयास मिळत नाही. त्यामुळे स्वेटर विक्रेते ग्राहकांची प्रतीक्षा करित आहेत.  

   
शहरात दिवाळी संपल्यानंतर परप्रांतीय व स्‍थानिक स्‍वेटर विक्रेते दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी स्‍टॉल लावतात. यावर्षी देखील गांधी चौक, शासकीय विश्रामगृह, बसस्‍थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्रेत्‍यांनी दुकाने उभारली आहेत. मात्र, अद्याप थंडीच पडली नसल्याने विक्रेत्यांना थंडीची प्रतीक्षा लागली आहे. दरम्‍यान येथे काही स्‍वेटर विक्रेत्यांनी प्रत्‍येक नगावर दहा ते पंधरा टक्‍के सुट दिली आहे.


शहरात दिवाळीनंतर नेपाळ, गुजरात, आंध्रप्रदेशासह स्‍थानिक स्‍वेटर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर स्‍वेटर विक्रीचे स्‍टॉल गांधी चौकात लावले आहेत. मात्र, अद्याप थंडीची चाहुल लागली नसल्याने खरेदीसाठी ग्राहक दुकानाकडे वळत नसल्याने या विक्रेत्यांना थंडीची प्रतीक्षा लागली आहे. दिवाळीपर्यंत परतीचा पाऊस सुरू होता, हा पाऊस संपल्यानंतर देखील अद्याप थंडीच सुरू झाली नाही. मात्र, विक्रेत्यांनी त्‍याचे स्‍टॉल उभारले आहेत. ग्राहक दुकानाकडे येत नसल्याने विक्रेते अडचणीत आहेत.

असे आहेत दर

बच्चे कंपनीसह वृध्दापर्यंत लागणारे स्‍वेटर, जर्कीन, कानटोपी, मफलर, हातमोजे विक्रीस उपलब्ध झाले आहेत. यात शंभरापासून ते सातशे रुपयापर्यंत स्‍वेटर, जर्कीन पाचशेपासून अडीच हजार रुपये, कानटोपी वीसपासून शंभर रुपयापर्यंत, मफलर पन्नास ते तीनशे रुपये, हातमोजे वीस ते शंभर रुपयापर्यंत विक्रीस उपलब्ध झाले आहेत. मात्र या विक्रेत्यांना थंडीची प्रतिक्षा लागली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

जर्किनचा वापर अधिक

पुर्वी गळाभरून असलेल्या स्‍वेटरची मागणी कमी झाली असून जर्किनचा वापर अधिक होत आहेत. तसेच मफलर, कानटोपी मागे पडली असून त्‍यात आता कानपट्या, मास्‍कला अधिक मागली असल्याचे विक्रेते सांगत आहेत. दरम्यान, बाजरपेठेतील विविध ठिकाणी ग्राहक केवळ फेरफटका मारून कपड्यांच्या किंमतीची चाैकशी करत असल्याचे पहावयास मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

SCROLL FOR NEXT