संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

कपाशी बियाणांची पुढील आठवड्यापासून विक्री

महेश गायकवाड

जालना -  मागील दोन वर्षात कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आलेले आहे. मात्र यंदा बोंडअळीचा धोका उद्‌भवू नये म्हणून पूर्व हंगामी लागवड टाळण्यासाठी कृषी विभागाने कपाशीच्या बियाणे विक्रीला स्थगिती दिली होती. कृषी संचालकांनी आता सोमवारनंतर (ता.२५) बियाणे विक्रीस कृषी केंद्राना परवानगी दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात येते. गत वर्षी दोन लाख ८६ हजाराहून अधिक हेक्टरवर कपाशीची पिकाची लागवड झाली होती. यावर्षी जिल्ह्याला १२ लाख ७९ हजार कपास बियाणाचे पाकिटे लागणार आहे.

जिल्ह्यात बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांनी जानेवारीनंतरही कपाशीचे पीक शेतात ठेवले होते. तसेच वाढीव पावसामुळे लांबलेल्या कापूस हंगाम त्याचबरोबर सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात एप्रिल महिन्यातही कपाशीचे पीक उभे होते. त्यामुळे बोंडअळीस नियमित खाद्य पुरवठा होऊन पुढील हंगामातील पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरीप हंगाम सुरू होतो. मात्र, सिंचनाची व्यवस्था असलेले अनेक शेतकरी त्यापूर्वीच त्याची लागवड करतात. पूर्वहंगामी लागवड झाल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्व हंगामी लागवड रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्व कृषी सेवा केंद्राना कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांना विक्री न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता लागवड कालावधी जवळ आल्याने बियाणे विक्री सुरू करण्यात येणार आहे.ता.२५ मे नंतर हे बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करता येणार आहे. 

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे करा 

लागवडीपूर्वी खोल नांगरट करून पूर्व हंगामी म्हणजे मे महिन्यातच कपाशीची लागवड टाळावी. जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणी करावी. लागवड करताना शेताच्या चहूबाजूने नॉन बीटी कपाशीची लागवड करावी. नत्र खताचा जास्‍तीचा वापर केल्यास पिकांची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून माती परीक्षणाच्या आधारावरच खतांच्या मात्रेचा वापर करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT